बुधवार, २१ जानेवारी, २००९

1. बन्या आणि मी


मी बंगलोर मधल्या एक नामांकित multinational कंपनीत आजच रुजू झालो होतो. बंगलोर मधील प्रसन्ना हवा आणि लठ्ठ पगाराची नौकरी त्यामुळे एकंदरित मी भलताच खुश होतो. त्यातून बंगलोर मध्ये साउथ चे ४ states सोडले तर मराठी पब्लिक चाच भरणा होता. मी ज्या टीम मध्ये join झालो त्या टीम मध्येच एक मराठी माणूस भेटला. त्याने लगेच एक रूटीन जॉब असल्या सारखे मला एक मराठी मुलाला भेटायला नेले.
“ही, मिलिंद”
“अरे hi” इति मिलिंद
“हा माझा नवीन टीम मेट. मकरंद कुलकर्णी”
“Hi , मिलिंद” मी लगेच शेक हैण्ड साठी हात पुढे केला. त्यानेही लगेच शेक हैण्ड केला आणि Hi म्हंटले.
माझा टीम मेट तिथून निघून गेला. मी आणि मिलिंद ने एक दोन एकाडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मिलिंद मला अजुन दोन तिन जणांना भेटायला घेउन गेला.
“हा बन्या, I mean अमोल कुलकर्णी” मिलिंद ने ओळख करून दिली.
“Hi अमोल, मी मकरंद कुलकर्णी”
“अरे वाह!!, म्हणजे तू पण कुलकर्णी आणि मी पण कुलकर्णी. मला लोक बनया म्हणतात तुला काय मक्या म्हणतात”
“अं?” मी त्याच्या प्रश्नाने एकदम चक्रवुनच गेलो. एक ५ फ़ुट १० इंच उंचीचा किड्कीडीत , गोल गोल चश्मा असा जेमतेम बारावी पास दिसणारा मुलगा मला पहिल्याच भेटीत एकदम बेमालूम पणे “मक्या” म्हणत होता.
तो पुन्हा बोलला
“अरे सहज विचारलं.मनाला लावून घेऊ नकोस”
“अं नही. पूर्वी शाळेत मुलं मक्या म्हणायची पण आजकल कोणी म्हणत नही”
“अरे वाह! कुठला आहेस?”
“मी पुण्याचा. तू?”
“मी अमरावती चा”
“अमरावती म्हणजे विदर्भा!”
“हो, पुण्याला कोणत्या कॉलेज मध्ये होतास?”
“M.I.T., तू?”
“मी K. K. Wagh. नाशिक”
“काय???? अरे तसा मी मूळचा नाशिक चाच आहे, पुण्याला शिकायला गेलो म्हणुन सगाळ्यांना पुण्यचाच सांगतो”
“नाशिक ला कुठे राहतोस?” बन्याचे प्रश्न काही संपत नव्हते. इकडे मिलिंद जरा कन्टाळल्या सारखा वाटला
“गंगापुर रोड ला” . मला अमरावती चे काही एक माहित नसल्यामुळे मी त्याला रहतोस कुठे हा प्रश्न विचारून काहीच उपयोग नव्हता.त्याचा तरीही चालूच.
“अरे वाह! मी गेलोय तिकडे एकदा दोनदा. Which year passout?” त्याचं टिपिकल विदार्भीय इंग्लिश
“२००१. तू?”
“२००४. हा तुझा पहिलाच जॉब आहे?”
“नाही अधि मुंबई ला होतो , मग नॉएडा ला आणि अत इथे.तुझा?”
“दूसरा, आधी हैद्राबाद ला होतो”
आमची गाड़ी आता महाराष्ट्राच्या भुगोलातून बाहेर पडून भारताच्या भूगोलात फिरू लागली होती. मिलिंद फारच बोअर झाला असावा. माणसाने किती वेळ तात्काळत उभे रहायचे ह्याला शेवटी काही तरी लिमिट आहेच ना. पण अमोल, म्हणजेच सो कॉल्ड बन्या अजुन मागे हटायला तयार नव्हता.त्याचे आपले सुरूच
“तुझे डेस्क कुठे आहे”
“इथेच, बाजुच्या विंग मध्ये.”
“चला म्हणजे शेजारीच आहे. प्रोजेक्ट मिळाला का?”
“हो. तुझा प्रोजेक्ट कोणता?”
“मी join झाल्यापासून बेंच वर आहे हा हा हा”
आता मात्र मिलिंद चा patience संपला. तो मध्येच बोलला
“मकरंद, मला जरा काम आहे, जाउया का?”
“हो चल, सी यू अमोल. भेटतच राहू”
‘कधीही टाइम पास करायचा असेल तर सांग मी फ्री च आहे. आणि हे अमोल वैगरे काय आहे. बन्याच म्हण.”
“ओके Then बन्या, बाय सी यू”
एकंदरित बन्या हे एक interesting character आहे हे माझ्या चाणाक्ष नजरेला लगेच जनावालं.त्यातून तो बेंच वर आहे म्हणजे माझ्या टाइम पास चा प्रश्नच सुटला होता.
मी आणि मिलिंद जाऊ लागलो तसा मागून ओरडला. “तुझा id मकरंद.कुलकर्णी ना!. मी मेल करतो”
“ओके” मी हसतच त्याला म्हंटले.आता तर माझ्या टाइम पास मेल्स चा पण प्रश्न सुटला होता.

1 टिप्पणी: