मंगळवार, ९ डिसेंबर, २००८

माझें मरण पाहिले म्या डोळा


सकाळी नेहमी प्रमाणे मी बस स्टॉप वर चालले होते.मध्ये दत्तमंदिर लगते.नेहमी प्रमाणे मी दत्ताला जाउन रस्ता क्रॉस करायला उभी राहिले.शास्त्री रोड वर नेहमी प्रमाणेच गाड्या धावत होत्या.तेच ट्रैफिक तोच मधला divider सगळ काही तसच.पण आजचा दिवस वेगला होता.
माझी ऑफिस ची बस पलिकडच्या बाजूला येते. अर्धा रस्ता क्रॉस करून मी divider आले आणि डाव्या बाजूची वाहने जाण्याची वाट पाहत होते.रस्ता जरा मोकला झाला.मी रस्ता ओलान्द्णार इतक्यात माझ्या डाव्या बाजूने एक रेड santro आली. ती इतकी जोरात होती की एकाच क्षण मी तिच्या अगदी समोर होते.एकाच क्षण ..मी ओरडले...माझे दोन्ही हाथ त्याला थांबवण्य्साठी समोर झाले...मला कळालं की मी रस्ता नाही क्रॉस करू शकणार आणि तशीच उभी राहिले तर santro मला उडवणार..मी पळत मागे गेले...santro आली त्याच speed ने निघून गेली...गाड़ी जारही ही slow झाली नही...मी मात्र वाचले...आज खरच वाचले...
एकाच क्षण माझा मृत्यु मला डोळ्यासमोर दिसला.मी पुढे जण्याऐंवजी मागे गेले म्हणुन आज जिवंत आहे.गाड़ी गेली मी रस्ता ओलांडला.बस स्टॉप वर आले.माझा collegue सगळ पाहत होता.तो बोलला आज खरच वाचालीस.जर का टक्कर बसली असती तर जीव वाचण शक्यच नव्हता.
बस मध्ये डोळ्यासमोर सारखा हच प्रसंग येत होता.मी दत्ताला जाउन आले म्हणुनच वाचले हाच दूसरा विचार माझ्या मानत आला. मी मनातल्या मनात दत्तशी बोलत होते. आज तूच मध्ये आलास न! तूच मला उचलून घेतलेस न! नाहीतर आज तुझी भेट अटळ होती आणि तो मात्र गालातल्या गालात हसत होता.

४ टिप्पण्या:

  1. there shd be a celebration if you think you have returned from the mouth of Death :D

    उत्तर द्याहटवा
  2. tuzhi writting style he agadi hubehub aahe aani mala he vachun swataha tya thikani asalyahcha aabhas hot aahe.

    उत्तर द्याहटवा
  3. I was the one to see when Vrushali was about to meet the accident and I can't explain the feelings in words, I just thank God to save her from meeting an accident. Had it been the other case I would probably have not come to office today but would have rushed to help her by all means.
    I wish and pray God Dattatray to keep her always safe and happy.

    my best wishes are always with you,

    Vijay

    उत्तर द्याहटवा