सोमवार, १३ एप्रिल, २००९

6.Annual day - part 2

सगळी तयारी झालीच होती .आदल्या दिवशीच उद्याच्या कार्यक्रमाची "रंगीत तालीम" घेण्यात आली होती. पहिलं गाणं "वाणी" ची "गणेश वंदना" तर दुसरं "वाणी आणि लक्ष्मी" चे "duet song".तिसरा नंबर बन्याचा होता आणि नंतर बाकी सगळे. दुपारी ४ वाजता ऑफिस च्या बसेस सगळ्यांना घेउन "The grand Ashoka" ला जाणार होत्या.ठरल्याप्रमाणे सगळं घडत होतं पण बन्या अजुन ऑफिस लाच पोहोचला नव्हता. जो येतो तो बन्या विषयीच विचारत होता.अजुन कसा आला नाही हा पोरगा म्हणुन मी त्याला फ़ोन लावला

"कुठे आहेस? कधी पोहोचणार?"
"हो हो निघतोच आहे"
"ओके लवकर ये.सगळे वाट पाहत आहेत तुझी"
"हो १५ मिनिटात पोहोचतो.रस्त्यातच आहे"
"ओके"

मी आणि सचिन pantry मध्ये चहा पीत होतो तेवढ्यात बन्या आलाच

"तुझ्या डोळ्याला काय झाले?"
"अरे यार काहीतरी चावलं रस्त्यात"
"गाडीवर असतांना?"
"हो"
"हेलमेट कुठे गेलं तुझं?"
"तुझा फ़ोन आला ना तेव्हा काढलं होतं"
"ओह, बराच लाल झाला आहे तुझा डोळा"
"हाना , फार चुर्चुरत आहे. जरा धुवून येतो"

बन्याचा डावा डोळा चांगलाच लाल झाला होता.जरावेळाने डोळ्याभोवती सूज पण जाणवू लागली होती.डोळयामधुन continous पाणी येत असल्यामुळे बन्या लास्ट टाइम रिहलसल वर पण concentrate करू शकत नव्हता.तासाभरात त्याचा डोळा टम्मं सुजला.

"यार मक्या , मी काही गाणं म्हणु शकणार नाही. फारच दुखतोय डोळा"
"एकदा डॉक्टर कड़े जाऊन दाखवू या. i होप काही severe नसावं"

मी त्याला डॉक्टर कड़े घेउन गेलो. त्यांनी बन्याला "eye drops" दिले आणि सांगितलं की २/३ दिवसात बरं होइल.काय तर त्याला एक बारीकसा कीडा चावला होता.

"हा कीडा पण आजच चावायाचा होता"
"जाउदे यार. आता चावल्यानंतर काय करणार"
"तेहि खरच आहे म्हणा"
"चल ऑफिस ला जाउया.तू एकदा final प्रँक्टिस कर आणि डायरेक्ट main प्रोग्रामलाच गाणं म्हण"
"हं"

ऑफिस ला पोहोचल्यावर बन्या गाणंच म्हणायला तयार होत नव्हता.बन्या गाणार नाही म्हटल्यावर सगळ्यांचाच मूड ऑफ़ झाला होता.आखिर बन्या "आकांक्षा ग्रुप" की जान होता.guitar वाला म्हणाला "for your song only i have brought this new guitar from my friend".
अतुल म्हणाला "तुझ्या शिवाय तर प्रोग्राम मध्ये जानच नाहीये काही.आम्हाला काही कन्नड़ गाण्यात इंटेरेस्ट नाहीये".तरी पण बन्या ऐकेच ना.शेवटी "दिव्या" म्हणाली "Without you , there is no enthu at all in "Akanksha"".मग मात्र लगेच बन्याची कलि खुलली आणि तो सुजलेल्या डोळ्याला पर विसरून गेला.
..........
"The Grand Ashoka" ला निघेपर्यंत बन्याची सूज पार गालावर उतरली होती.असा सुजलेला बन्या फारच भयंकर दिसत होता.सचिन ने बन्याला black गौगल दिला.तरी सुध्धा सूज काही लपत नव्हतीच.पाहिले फालतू "presentations" झाल्यावर "आकांक्षा"च्या प्रोग्राम ला सुरुवात झाली. अजस्त्र "अन्जेलो" ने सूत्र संचालानस सुरुवात केली.
"Ladies and Gentleman....."

अखेर बन्या च नंबर आला आणि तो सगल्या पब्लिक समोर स्टेज वर उभा राहिला. offwhite सलवार कुरता , डोळ्यावर काळा गौगल आणि हातात माइक.स्टेज वर बन्या उभा राहिला आणि धडधड माझ्याच छातीत सुरु झाली. मी बैक स्टेज ला जाऊन पाहिले आणि "लक्ष्मी" च्या हातात माइक नाही ना ह्याची खात्री करून घेतली.ह्याच्या हातात माइक सापडला तर तो "ला ला ला ला" गायल्याशिवाय काही राहणार नाही ह्याची मला खात्री होती.पण Thank God "लक्ष्मी" कड़े माइक नव्हता. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि कान देऊन ऐकू लागलो. सुरुवातीची guitar वाजायला लागली.synthesizer ने रणशिंगं फुंकले आणि एक ठरवलेल्या drumer च्या ठोक्यावर बन्याने गायला सुरुवात केली

"नीले नीले अम्बर पर....चाँद जब आए"
"हमको तरसाए ...प्यार बरसाए"

चला सुरुवात तर चांगली झाली.

"ऊँचे ऊँचे परबत जब चुमते है अम्बर को"
"प्यासा प्यासा अम्बर जब चूमता है सागर को" ......

ऊँचे ऊँचे परबत अकस्मात् इतके उंच गेले की पुढच्या ओळीला पण खालीच आले नाहीत आणि synthesizer धपकन खाली पडला.त्याला सांभाळायला drumer गेला पण तो भलतिकडेच जाऊन कोलमडला.चाणाक्ष बन्याला जशी त्याची चुक कळाली तशी त्याने डिरेक्ट दरीतच उडी मारली

"प्यार मी कसने को, बाहोमे बसने को"
"मेरा मन ललचाये कोई तो अजाए"

खाली गेलेला synthesiser वरती यायला निघाला नि पुन्हा drumer शी त्याची चुकामुक झाली.पण बन्या हिम्मत हरला नाही

"ऐसा कोई साथी हो..ऐसा कोई प्रेमी हो..प्यास दिल की बुझा जाए...."
"नीले नीले अम्बर पर......"
...............

अखेर ते शेवटचं मूळ गाण्यात असलेलं "ला ला ला ला" झालं आणि बन्याचं गाणं संपलं.

"चित्रा' चं "यह मेरा दिल" पण झालं आणि violine, बासरी , तबला सगळं काही सुरळित पार पडलं.

"आकांक्षा ग्रुप" डिनर हॉल मध्ये एक बाजूला बऱ्याच खुर्च्या एकत्र टाकुन बसला होता आणि सगळ्यांच्या मध्ये होता गौगल वाला बन्या.जो तो येउन त्याला "wel sung...... good.......very nice' म्हणत होते आणि बन्या "thanks" म्हणत एन्जॉय करत होता. त्याच्याकडे पाहून मला "दिव्या"चेच शब्द आठवत होते "Without you , there is no enthu at all in "Akanksha"".

घोळक्यातून बन्याचे लक्ष माझ्याकडे गेले. त्याने मला खुणेनेच विचारले
"कसं झालं गाणं?
मी खुणेनेच त्याला सांगितले
"Wel done"

२ टिप्पण्या: