शनिवार, २१ फेब्रुवारी, २००९

5.Annual day - Part 1

दर वर्षी प्रमाणे येणारा annual day महिन्या भरावर येउन ठेपला होता.ज्याना "काम करणारे" अणि "काम न करणारे" resource manage करायचे असतात अश्या Resource manage ग्रुप ने ह्या वर्षीच्या "Annual day" साठी एक नविन टुम काढली. कंपनी चा स्वतः च ऑर्केस्ट्रा. त्यांनी जिकडे तिकडे मोठे मोठे पोस्टर्स लावून ठेवले "Promoting Hidden Talent". ही पोस्टर्स पाहून स्वारी माझ्याकडे आली.

"ए मक्या , जायचं का ऑर्केस्ट्रा मध्ये?"
"नाही बाबा, आपल्याला काही येत नाही गाणं बिणं. आणि तसही ते काही फार ग्रेट नसणारच आहे.फुकट मंडळीँनी स्वतः च्या टाइम पास साठी केलेला उद्योग आहे हा"
"तू असं कसं बोलू शकतोस? they are searching hidden talent"
'and do you think you have that?"
"obviously"
"मग तू जा बिनधास्त. मी तुझ्या पाठीशी आहे"
"मी सिंगर च्या ऑडिशन ला जाणार आहे"
"ok so?"
"so???? तू निदान मला cheer up करायला तरी चल"


"मी काय म्हणतो, तू सेलेक्ट झाला की मी येइन ना cheer up करायला"
"anyway मी सचिन अणि अतुल ला विचारतो"


ते दोघाही प्रोजेक्ट मध्ये असून नसल्या सारखेच होते त्यामुळे हे तिघे लगेच ऑडिशन ला गेले.आणि आश्चर्य म्हणजे बनया सेलेक्ट पण झाला.माझ्या मानत विचार आला "बन्या खरच चांगलं गाणं म्हणत असेल का? मीटिंग मध्ये जाऊन पहायला काय हरकत आहे?"

शेवटी में ग्रुप मीटिंग मध्ये गेलोच. मी ज्या मीटिंग मध्ये गेलो त्या मध्ये ग्रुप चं नाव ठरवण्यात येणार होते. HR आणि RMG दोन्ही डिपार्टमेन्ट फारच उत्साह दाखवत होती. ग्रुप ची लीड मेंबर होती Human Resource ची "दिव्या" आणि त्या खालोखाल Resource Manage Group ची "चित्रा".त्या दोघींनी सगळ्यांना आपापल्या आवडीची नावं suggest करायला सांगितली होती आणि आज त्यातून ग्रुप चे नाव ठरणार होते.

बन्याने त्याची लिस्ट वाचायला सुरुवात केली
"दिशा, मनीषा , आकांक्षा , मानसी ......."
बन्या व्यतिरिक्त अजुनही बऱ्याच मुलांच्या लिस्ट मध्ये २ ४ नावं common निघाली. तर मुलींच्या लिस्ट मध्ये "आकाश , क्षितिज , परिचय ..." अशी नावं होती.
सर्वानुमते "आकांक्षा" हे नाव फायनल झालं।"ही मुलगी कोण आहे मला शोधलाच पाहिजे". असो

"आकांक्षा" ग्रुप ने अखेर नारळ फोडला. एक drummer, एक synthesizer player आणि एक तबला वादक अश्या लिमिटेड instruments मध्ये ८ १० singers आणि माझ्यासारखे १० १२ "बघे" or back stage helpers अश्या सगाळ्यांनी मिळून प्रँक्टिस सुरु केली.

चित्रा ने "ये मेरा दिल" गाणं निवडलं. कन्नड़ चित्रा हे गाणं अश्या प्रकारे म्हणत होती की जर "आशा भोसले" ने ऐकलं असतं तर चक्करच येउन पडली असती आणि "हेलन" ने ऐकलं असतं तर पायात पाय अड़कुन पडली असती."संजय" ने सोनू निगम पकडला तर "अर्शदीप सिंघ' ने "सुखविंदर सिंघ" पकडला."कावना" हाथ धुवून "लता मंगेशकर"च्या मागे लागली तर बन्या ने direct "किशोर कुमार"चाच गळा पकडला.
गाणं तरी काय भारी निवडलं "नीले नीले अम्बर पर चाँद जब आए.."

२ ३ दिवसांपासून कंपनीतली अनुभवी मंडळी कोणीतरी "लक्ष्मी" ची वाट पाहत होती."लक्ष्मी" आणि "वाणी" कोणतं तरी "duet" म्हणणार होते"."वाणी" बऱ्या पैकी चांगलं गाणं म्हणत होती त्यामुळे "लक्ष्मी" पण चांगलच गाणं म्हणनारी असावी असं मला वाटलं". माझा अंदाज बरोबरच निघाला फक्त "लक्ष्मी" ती नाही तर "तो" होता.ह्या दोघांचे हे "कन्नड़ duet" सोडले तर बन्याच लीड सिंगर होता.आमच्या सोनू निगम आणि सुखविंदर बद्दल तर न बोललेलेच बरे.

बन्या ने गाणं म्हणायला सुरुवात केलि "नीले नीले अम्बर पर" पण भट्टी काही जमेनाच तेव्हा अतुल च्या लक्ष्यात आलं की आपल्याकडे guitar च नाहीये. तो बिचारा ओरडून सांगू लागला
"guitar ही ह्या गाण्यातली neccessity आहे. Either find a guitar player or search for another song।"

बन्या मात्र ह्याच गाण्यावर अडून बसला.शेवटी शोधून शोधून एकदाचा guitar प्लेयर मिळाला आणि प्रँक्टिस पुन्हा सुरु झाली.बन्या "गाण्याच्या पट्टी" मध्ये असा काही वर खाली होत होता की माझा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खालीच राहत होता. कही केल्या बन्या , synthesizer आणि guitar syncronise होतच नव्हते.शेवटी"लक्ष्मी" बन्याच्या मदतीला धावला. "लक्ष्मी" ला गाण्याची चांगलीच जाण होती पण त्याचा "लैंगुएज प्रॉब्लम" होता.त्याला हिन्दी येत नव्हते. मग त्यानेच एक शक्कल काढली.बन्या हिन्दी गायचा आणि तो फ़क्त tune गायचा.
बन्याने "नीले नीले अम्बर पर" सुरु केले की "लक्ष्मी" त्याच्या बरोबर गायचा "ला ला ला ला"

अशी मदत "लक्ष्मी" सगळ्यांनाच करत होता त्यामुळे सबंध प्रँक्टिस मध्ये फक्त त्याचं "साउथ इंडियन" accent मधला "ला ला ला ला" असच ऐकू यायचं.सचिन मला म्हणाला
"हा काही ला ला ला सोडणार नाही".
"लक्ष्मी" ला ला ला करायला लागला की बन्याचा चेहरा एवढासा होऊन जायचा आणि "नीले नीले अम्बर" भलतेच कुठेतरी निघून जायचे.पण चिगट "लक्ष्मी" त्याचा "ला ला ला' काही सोडत नव्हता.

रोज ट्रेनिंग रूम मध्ये चालणारी प्रक्टिस पाहून कंपनीतल्या अजुनही बऱ्याच जणांना उत्साह आला. आपल्यात काहीतरी Hidden Talent आहे असं ज्याला त्याला वाटू लागलं."अरुण" ने डायरेक्ट आमच्या तब्बलजीलाच आव्हान केलं त्यामुले त्या दोघांची ५ मिनिटांची "तबला जुगलबंदी" ठेवण्यात अली.एका माणसाला "violine" परफॉर्मेंस द्यायची इच्छा झाली तर एकला "बासरी" वजवयाची.एक मुलगी तर चक्क "माझा भरतनाट्यम ठेवा" असं पण म्हणू लागली."दिव्या" ने कसं बसं तिला "we will keep dance performances in next program" असं सांगुन कटवलं.

एवढे जास्त "talents" झाल्यामुले आमच्या च्या प्रोग्राम ची पूर्वीची वेळ वाढवुन पूर्ण ४५ मिनिटांचा प्रोग्राम तयार झाला.त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रोग्राम चं 'सूत्र सञ्चालन" करायची गरज भासु लागली. अखेर "अन्जेलो" ने ती जबाबदारी स्वीकारली. त्याच्या "अस्खलित मल्ल्यालम इंग्लिश" मध्ये त्याने "anchoring" ची प्रक्टिस सुरु केलि.

अखेर तो "D डे" उजाडला.

२ टिप्पण्या: