सोमवार, १३ एप्रिल, २००९

7.डायरी

आज मला काही कामच नव्हतं.नुकताच annual day झाला होता त्यामुळे सगळेच जण आरामात होते.तेवढ्यात माझा फ़ोन वाजलाच.मी काही बोलायच्या आतच पलीकडून बन्याचा आवाज आला

"काय करतोस?"
"काही नाही.मेल्स चेक करत आहे"
"चहा ला येतोस?"

मी पण टाइम पास साठी काहीतरी पाहतच होतो।
"चल. ये कैफेटेरिया त "

मी तिथे पोहोचायच्या आधीच साहेब तिथे हजर
"काय म्हणतोय आकांक्षा ग्रुप च हीरो?"
"अरे काही नाही यार.असाच टाइमपास चालु आहे.माझा प्रोजेक्ट असाही असून नसल्यासारखाच आहे.काय करावं सुचत नाही आणि आता annual day पण नाही टाइमपास ला"
"इट्स ओके यार.मिळेल काही ना काही. मलाही आज काही काम नाहीये"
आम्ही चहा घेउन आमच्या नेहेमीच्या कट्ट्यावर बसलो.
"मक्या , एक सांग तू कधी डायरी लिहिली आहे?"
"नाही बाबा.का?"
"अरे असच मला वाटलं की डायरी लिहावी.आपले अनुभव डायरीत लिहून ठेवावे"
"Thats a good idea पण अचानक हे डायरी चं खुळ तुझ्या डोक्यात कसं आलं?"
"असच"
"खरं सांग कोणी भरवलं हे खुळ तुझ्या डोक्यात"
"अरे खरच कोणी नाही.माझ्याच मनात आलं"
"अच्छा.मग लिही की डायरी.त्यात मला विचारण्यासारखं काय आहे?"
"कशी लिहायची डायरी"
"में लहानपणी कुठेतरी वाचलेलं आठवतय की रोज जे जे काही होतं ते ते लिहून ठेवायचं आणि ही डायरी कोणाच्या हाताला लागू द्यायची नाही .पण ती आपल्या अपरोक्ष कोणीतरी गुपचुप वाचावी अशी इच्छा मात्र ठेवायची.ती अशा जागी ठेवायची की लगेच सापडली पाहिजे अणि लगेच कोणीतरी वाचली पाहिजे"
"तू माझी टिंगल करत आहेस?"
"हा हा हा नाही यार खरच.प्रत्येक माणसाला असच वाटत असतं.नाहीतर आपण पिक्चर मध्ये डायरी आणि त्यावरून घडलेला पिक्चर उगाच पाहिला असता का?"
"पण मी माझी डायरी कोणालाच वाचायला देणार नाही"
"मग तिचा काय उपयोग?"
थोड़ा विचार केल्यासारखं करून बन्या म्हणाला
"yea..actually मग डायरीचा काय उपयोग?"
"अरे एवढा विचार काय करतोस.तू आधी डायरी तर लिही.मग पाहू"
"हो ना पहिले एक डायरी विकत आणली पाहिजे"
............................
बन्याने त्याच दिवशी डायरी विकत आणली आणि रात्रीच डायरी लिहायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला भेटला तेव्हा त्याला विचारले
"काय मग लिहिली का काल डायरी"
"हो,मग समजलास काय मला.एकदम मस्त लिहिली"
"wow...keep it up"

त्यानंतर बन्या ३/४ दिवस भलताच खुश होता. त्याने सलग ५ दिवस डायरी लिहिली होती. बन्याचा हा उत्साह किती दिवस टिकणार आहे ह्याबद्दल मला शंका होतीच. सन्डे ला त्याचा फ़ोन आला
"काय करतोस?"
"काहीच नाही आत्ताच उठालो.तू काय करतोस?"
"काही नाही.आता काय करणार मी.सगळं संपलं आहे"
"what? काय संपलं आहे?"
"काही नाही रे.मूवी ला येतोस?"
"ओके.मी येतो तुझ्या रूम वर.मग जाउया"
"ओके"

में त्याच्या रूम वर गेलो तर जणू देवदास ची खोली असावी अशी अस्ताव्यस्त पसरली होती.
"हे काय तू अजुन असाच?"
"असाच म्हणजे?"
"आवरलं का नाही.लगेच निघालो असतो"
"आवरतो.तू बस मी आंघोळ करून येतो"

मी स्वतः साठी थोडीशी जागा करून घेतली आणि गादी वर बसलो.पाहतो तर काय शेजारीच बन्याची डायरी. माझ्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली.म्हणजे ह्याने ही डायरी मी वाचावी म्हणूनच इथे ठेवली आहे. मी लगेच ती डायरी उचलली आणि पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली.

पहिल्या पानावर right साइड च्या कोपऱ्यात सुंदर अक्षरात नाव घातले होते."अमोल कुलकर्णी".बन्याचे अक्षर फारच छान होते.हा पोरगा शाळेत एक गुणी पोरगा असेल बहुदा.

मी पान उलटले
"१३/७/२००४

काल आकांक्षा सहज बोलून गेली आणि मी डायरी विकत पण आणली.मी डायरी लिहित आहे ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. केवल तुझ्यासाठीच मी डायरी आणली.तू काय लिहितेस डायारित?उदया तुला विचारतो"
--

ओह्हो म्हणजे ती ग्रुप च्या नावाची खरी खरी पोरगी ह्याला भेटली आणि तिनेच त्याला डायरी लिहायला बसवलं. सही है भिडू. मी लगेच पुढचे पान उलटले

"१४/७/२००४

आज आकांक्षा ने पिंक ड्रेस घातला होता.किती सुंदर दिसत होती.हसते पण किती गोड. पण ती जेवायला QA ग्रुप बरोबर जाते.मी उदया तिला लंच ला invite केलं तर ती येइल का?
--
ओह्हो म्हणजे ह्याच्या टीम मध्ये QA मध्ये ही आकांक्षा आहे तर

"१५/७/२००४

आज आमची टीम मीटिंग झाली आणि मेनेजर तिच्यावर जाम भडकली. तय "सिल्व्या" ला गोळ्याच घातल्या पाहिजे.बाकीचे इतके लोक आहेत ना QA मध्ये, ते करतील काम.कशी म्हणाली "आकांक्षाने सर्वात कमी bugs काढले आहेत". किती नर्वस झाली होती आकांक्षा. bugs शोधत बसली होती नंतर. माझा लंच चा प्लान चौपट झाला."
--

बन्याच्या अक्षराला काय झालं? पहिल्या पानावर तर चांगलं होतं...


"१६/७/२००४
किती खुश होती माझी bugs बनी आज.काल भरपूर टेस्टिंग केल्यामुळे "सिल्व्या" एकदम खुश झाली होती and so bugs बनी सुद्धा. आता मी तिला उदया लंच ला विचारातोच. की saturaday ला मूवी, डिनर असं विचारू?"

--
नाव तरी काय ठेवलं आहे bugs बनी म्हणे

"१७/७/२००४

बिचारी bugs बनी.किती ताप भरला आज तिला. ती म्हणाली बस येइपर्यंत माझ्याबरोबर बस स्टाँप वर उभा रहा. पण उगाच तिला काही झालं तर. मी तिला घरापर्यंत सोडायला गेलो तेव्हा पण तिला खुप बरं वाटत नव्हतं. तिला डॉ कड़े घेउन गेलो आणि औषधं पण आणून दिली.मला कसं म्हणते "monday ला पैसे देइन"
मी कसं सांगू तिला.नको देउस गं पैसे.पैसे तुझ्यापेक्षा important थोडीच आहेत? उदया तिला surprise घरीच भेटायला जातो"

--

म्हणजे काल बन्या खरच तिला भेटायला गेला होता की काय

"१८/७/२००४
किती खोटारडी आहे ती.चांगली बरी होती.बॉय फ्रेंड बरोबर बाहेर चालली होती.मला ओळख पण करुन दिली. तो पण म्हणतो कसा "Thanks for helping her".
चक्का हसत हसत निघून गेले दोघं....मी एकटाच वेड्यासारखा तिथे उभा.गेली उड़त ती आकांक्षा"
....................
बन्याच्या अक्षराची पूर्ण वाट लागली होती. एखाद्या झुरळाला ink मध्ये बुडवून कागदावर चालवल्यास कसं अक्षर येइल तसं लिहिलं होतं पठ्याने

---

"वाचलिस डायरी ?"
"अरे सही timing आहे तुझं बन्या. अगदी मी लास्ट पेज वाचायला आणि तू बाहेर यायला एकच वेळ झाली"
"what do you mean ?"
"nothing. but i am sure about one thing"
"what?"
"तू आजपासून काही डायरी लिहिणार नाहीस. This is the last page in your diary?"

सगळं काही clear झालं होतं.बन्याकडे लपवण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं आणि सांगण्यासारखं मी already वाचून काढलं होतं.

..............

monday ला सकाळीच बन्याचा चहा साठी फ़ोन आला. आम्ही चहा घेउन आमच्या नेहेमीच्या कट्ट्यावर बसलो
"मक्या एक सांग"
"बोला"
"तू कधी blogs लिहिले आहेत?"

again?????nooooooooooooo

1 टिप्पणी: