गुरुवार, २० ऑगस्ट, २००९

10.बन्याचा जोश

"hello"

१० रिंग झाल्यावर एकदाचा बन्याने फ़ोन उचलला

"thank god तू जिवंत आहेस"
"अरे यार मजाक मत कर. खरच खूप busy होतो मी"
"तू रोज ऑफिस मधे १६ १६ तास असतोस आणि मी तुला १ week झाले पाहिलं देखिल नाहीये ... सही आहेस तू"
"अरे छोड़ ना हे लोक माझा जीव घेत आहेत तू बोल कसा आहेस?"
"मी ठीक आहे रे चहा ला येतोस?"
"नाही यार खूप काम आहे... संध्याकाळी कॉल च्या आत complete करायचं आहे"
"होईल रे ते .. ये ना खाली १० मिं टाइमपास करू"

"नको रे आधीच मला दिवसातून एकदा तरी RMZ च्या बिल्डिंग ला जावं लागतं तिथे येण्या जाण्यात खूप टाइमपास होतो अजुन १० मिं टाइमपास मला परवडायचा नाही"

"i heard that building is very good"

"हं चांगली आहे"

"पण तू RMZ च्या बिल्डिंग मध्ये का जातोस"

"अरे तिथे बरेच लोक शिफ्ट झाले आहेत आणि माझी मेनेजर, BA , QA सगळे तिकडेच बसतात"

"ते सिल्व्या garfield तिकडे गेलं का बसायला"

"हो ना फारच त्रास झाला आहे....... मी पण म्ह्टलं की development team पण तिकडे हलवा तर म्हणजे desk set up झाले नाहीयेत"

"मग तिकडे डेली कसा जातोस स्वतःचं पेट्रोल खर्च करून? i think its 1/2 km from this building right?"

"नाहीरे मला क्लाइंट ने cab दिली आहे घरी यायला जायला म्हणजे माझ्याकडून दिवस रात्र काम करून घेता येइल........१५ दिवस झाले माझी bike बंदच आहे.... RMZ ला जायला shuttle service आहे दर १ तासाला...... खाली जाऊन उभं राहायचं van आली की जायचं"

"आणि १ तासाच्या आत काम झालं तर?"

"तर काय तिथेच van येइपर्यन्त टाइमपास करायचा "

"काहीतरीच १ तासाला frequency फार कमी आहे "

"तसं त्यानी cycles पण ठेवल्या आहेत जर कोणी enthu असेल तर यायला"

"काय म्हणतोस cycles? आणि कोण चालवतं cycles?"

"अरे कधी खुपच मजबूरी आली तर होइल उपयोग.... बरं ठेउ का फ़ोन खूप काम आहे"

"ओके ठेव take care"
"yea thanks bye"बन्या ह्या प्रोजेक्ट मध्ये वाईट फसला होता. मी निमुटपणे एक मेल उघडले आणि डझन भर लोकांना फॉरवर्ड केले. मी एकटा असा किती टाइमपास करून करून करणार :(------------------------------------------
मी बस स्टाँप वर ऑफिस च्या खटारा बस ची वाट पाहत होतो. तेवढ्यात माझा फ़ोन वाजला......ऑफिस चा नम्बर...... सकाळी ८.३० वाजता मला ऑफिस मधून कोण फ़ोन करणार..... मी फ़ोन उचलला ....पलीकडून एका बाई चा आवाज आला"Am i speaking to Makarand"

"yea tell me"

"This is Laxmi,calling from medicle रूम..What time are you reaching office Sir?"

"I am waiting for bus ....will be in office in another half an hour .....what happened?"

"your friend has fainted in office and your number was written under emergency , so we have called up you"

"what??? who is that?"

"Amol kulkarni"

"what???????"मी बन्याचं नाव ऐकून उडालोच ....................ह्याला चक्कर आली आणि तो ऑफिस मध्ये पडला?""yes Sir.. Let me handover the phone to patient"तिने फ़ोन बन्याला दिला.त्याचा रडका आवाज ऐकू आला


"मक्या"

"are you ok?"

"हो ठीक आहे... मेडिकल रूम मध्ये पडून आहे तू कधी पोहोचत आहेस?"

"आत्ताच बस मध्ये बसलो आहे येतोच अर्ध्या तासात... तू काही खाल्लस का?"

"हो मला Glucon D दिला ह्या लोंकानी"

"ओके तू रेस्ट कर मी पोहोचतोच"-------------------------------------------


"yes"
ती नर्स कम डॉक्टर मला म्हणाली

"I am मकरंद........ some time back i have got a call from Laxmi for Amol"

"yea my name is लक्ष्मी ...... he is there in other room"मी बाजुच्या रूम मध्ये गेलो तर हा तिथे बेड वर झोपलेला.... मी त्याला उठवले


"काय झालं रे? रात्रभर जागाच होतास का?"
"नाही यार आज चांगलीच ट्रेजेडी झाली"
"काय झालं?"
"मी सकाळी ऑफिस ला आलो आणि मेल ओपन केला तर reminder आलं..that was meeting request"
"बरं मग?"
"माझी RMZ बिल्डिंग मध्ये मीटिंग होती.सगळ्यांचा video conference कॉल होता क्लाइंट बरोबर आणि मी पार विसरुनच गेलो होतो"
"ओह्हो मग?"
"नशीब ते reminder १५ मिं आधी आलं. मी धावतच खाली गेलो तर कळालं की shuttle service ९ पासून स्टार्ट होते"
"मग?"
"मझ्याजवळ RMZ ला जायचा काहीच option नव्हता... biike घरी होती आणि 2km मी चालत जाणं शक्य नव्हतं"
"dont tell me now तू cycle वर गेलास"
"unfortunately yes"

"हा हा हा हा"
"हसू नकोस"
"हसू नको तर काय करू? पुढे सांग कसा काय इथपर्यंत पोहोचलास"
"मी "जोश में आके" cycle वर निघालो.....एक तर मी ८ वर्षानी cycle वर बसत होतो... एवढं अवाढव्य शरीर घेउन मी कसाबसा cycle वर बसलो आणि cycle चालवायला सुरुवात केली..... balance करत करत थोड़ा पूढे गेलो RMZ ची बिल्डिंग दिसत होती. पण बिल्डिंग च्या आधी खुपच चढ़ आहे रस्त्याला............ मी तर ना ब्रेकफास्ट केला होता ना चहा प्यायलो होतो........ चढवरून कशी बशी cycle चढवत नेत होतो पण जमलच नाही....... शेवटी cycle हातात धरली आणि चालायला लागलो पण already इतका थकलो होतो की बिल्डिंग जवळ गेलो आणि बाहेरच पडलो"

"मग?"

"२/३ सिक्यूरिटी धावत आले आणि मला सिक्यूरिटी रूम मध्ये बसवलं...... तोंडावर पाणी मारलं..... मला जरा बरं वाटलं पण लगेच चक्कर आली"

"ओह नोह मग?"

"i think त्यांनी नंतर cab बोलावली आणि मला त्यात घालून इकडे main बिल्डिंग ला मेडिकल रूम मध्ये आणलं............. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी इथेच पडून होतो"

"हा हा हा this is called back to pavallion"

"हां ना.... लक्ष्मी ने मग मला Glucon D आणि glucose बिस्किट्स दिले आणि तुला फ़ोन केला... माझी मेहेनतहि वाया गेली आणि कॉल पण ...वर मेनेजर च्या शिव्या खाव्या लागतील त्या वेगळ्याच "

"well done बन्या म्हणजे अशा तर्हेने तुला VCON ला जाताच आलं नाही"

"नाही ना"

"VCON कधी पर्यंत आहे?"

"till ९.३०"
"wow..so तुला असही ९.३० पर्यंत कोणीच कॉल करणार नाहीये आणि खूप दिवसात आपण चहा ब्रेकफास्ट पण बरोबर केला नाहीये"
"सो??"
"so you have exactly 20 mins free time...its a perfect time to do timepass.... काय बोलतोस? कैंटीन????????????????????"
"हा हा हा हा "

बुधवार, २२ जुलै, २००९

श्रावण मास

श्रावण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी

मंगळवार, २ जून, २००९

9.Knowlege Transfer

"hello"
"अरे कुठे आहेस?आज चहा ला नाही येणार का?"
"अरे मी थोडा busy आहे , नंतर फ़ोन करतो"

बन्या busy आहे? आज काय झाले तरी काय? परत कोणत्या तरी पोरीच्या मागे लागलेला दिसतोय. ह्याला एवढ्या पोरी भेटतात तरी कुठून देव जाणे. आज मी एकटाच चहा पिउन आलो आणि काम करू लागलो.
....

आज तर बन्याची कमालच झालिये, लंच टाइम झाला तरी ह्याचा पत्ता नाहीये. मी परत बन्याला फ़ोन केला

"hello"
"हं बोल"
"आज लंच तरी करणार आहेस की नाही?"
"हां यार. तू असं कर कैंटीन मध्ये ये मी तुला तिकडेच भेटतो"
"ok"

मी कैंटीन ला जाऊन पोहोचलो तोच स्वारी एवढा मोठा चेहरा करून माझ्यासमोर आली

"काय मग ! आज फारच busy दिसत आहेस..कोणी नवीन भेटली वाटतं"
"अरे काहीतरी काय यार......माझी KT चालू होती"
"ohhhhh..i forgot...आज पासून तुझी KT चालू होणार होती...how is it going on?"
"अरे तुला माहित आहे का बाला Oracle join करत आहे"
"is it?"
"त्याला ८०% hike मिळाली आहे"
"काय???? सही आहे एकदम"
"हा ना..बाला तसा technically खुप sound आहे..तो सांगत होता त्याचे total ८ rounds झाले होते interview चे"
"yea, i heard की Oracle मध्ये खूपच rounds असतात interview चे"
"आणि आता त्याला server वरही काम करायला मिळणार आहे..त्याला रोल पण खुप चांगला मिळाला आहे"
"हो का..सही आहे"
"त्याचं इथे पॅकेज खुपच कमी होतं आणि आमच्या प्रोजेक्ट मध्ये खुपच पॉलिटिक्स चालू होते असं तो म्हणाला"
"ओह..म्हणून त्याने जॉब change केला का?"
"हो...आणि "सिल्व्या" त्याला सारखं onsite ला पाठवत होती..पण त्याची फॅमिली इथेच असल्यामुळे त्याला जायचं नव्हतं..मग खुप issues झाले होते प्रोजेक्ट मध्ये..शेवटी त्याने पेपर टाकला"
"काय रे तुम्ही KT मध्ये ह्याच गप्पा करत होतात का?"
"ह्याच नाहीं पण ह्या देखिल गप्पा करत होतो"
"बन्या ते application नीट शिकून घे, नाहीतर बाला निघून जाईन आणि तुझी वाट लागेल"
"ती तर लागणारच आहे"
"ते कसं?"
"आमचा japanese client आहे ना"
"awesome"
"तिकडे एक माणूस आहे Kiato म्हणून, तो बाला ला खुप छळायचा...त्याच्याशी आता रोज माझा "कॉल" असणार आहे"
"ओह I see ..म्हणजे तो आता तुला छळणार आहे का?"
"हो..रोज सकाळी ९ वाजता..तो त्याचे "Concerns" raise करणार आणि मी ते "End of the day" resolve करायचे आणि त्याला status mail पाठवायचे"
"तसं ठीक आहे..तुला एक पूर्ण दिवस मिळेल "Concerns" resolve करायला आणि..."
"आणि काय?"
"हा हा हा .....आणि पूर्ण रात्र पण...in case required"
"and worst part is त्याचं इंग्लिश मला कळतच नाहीये..आणि माझं त्याला..तुला तर माहितच आहे की माझा इंग्लिश किती धन्य आहे ते..मला आता "A for appal, B for boy" च रट्टा मारावा लागणार असं दिसते"
"हा हा हा..अरे हळु हळु जमतं ते..रोज रोज Kiato शी बोलून तू थोड्याच दिवसात चांगला इंग्लिश काय चांगलं japanese सुध्धा बोलू लागशील"
"very funny"
"is it?"
"चल मी जातो KT घ्यायला"
"आणि नीट समजुन घे ते application"
"हो घेतो रे..application कुठे पळून जातं का"
"all the best"

......

पुढचा पूर्ण आठवडा बन्या मला "बाला च्या गोष्टी" सांगत होता.बालाची फॅमिली, बाला चा फ्रेशर असल्यापासूनचा बायोडाटा, native place, कॉलेज , मुलाची शाळा पासून तर बाला आणि सिल्व्याचे भांडण, Kiato चे किस्से हे सगळं बन्याने मला संगीतालं.

बाला चा "लास्ट डे" झाला.बन्याच्या टीम ने त्याला चांगली fairwell party दिली आणि गिफ्ट पण दिले. आता फक्त बन्याच एकटा किल्ला लढवणार होता.

जसं जसं बन्या ने एकट्याने Concerns" resolve करायला सुरुवात केली तसा तसा त्याचा जास्तीत जास्त वेळ ऑफिस मध्येच जाऊ लागला. हळु हळु त्याला समजू लागले की त्याला काहीच application माहित नाहीये. Kiato ने query विचारली की ते शोधायला बन्याचा तास अन् तास खर्च होऊ लागला. Kiato अधून मधून escalations करू लागला तशी "सिल्व्या" आणि बन्याची भांडणं होऊ लागली आणि Kiato च छळवाद वाढायला लागला. कधीही बन्याला फ़ोन केला की तो एक तर debugg तरी करत असायचा नाहीतर Kiato बरोबर "कॉल" मध्ये तरी असायचा. हे सगळे कमी होते की के म्हणून बन्याच्या knowledge वरच संशय घेतला जाऊ लागला आणि एक दिवस बन्या रडक्या चेहेरयाने माझ्या डेस्क वर आला.

"चाह ला जायचा?"
"हो चल ना,विचारतोस काय ? आमचे अहोभाग्य जो तू डेस्क वर आलास चहा ला न्यायला"
"मक्या..मी अजिबात jokes करायच्या मूड मध्ये नाहीये"
"ओके ओके..चल चहा घेउया"


आम्ही चहा घेउन आमच्या नेहेमीच्या कट्ट्यावर बसलो

"एक न्यूज़ आहे यार"
"काय बोल ना?"
"सिल्व्या ने माझा visa process करायला initiate केला आहे"
"अरे सही.. This is really a good news"
"No, its really a bad news"
"काहीतरीच..कधीचं onsite जायचं जायचं म्हणत होतास आणि आता Opportunity मिळत आहे तर का नको"
"कारण Kiato wants me to have full knowlege on the application so that i could resolve issues within time"
"so?"

"so???? Silwya is sending me to Japan to get full knowlege transfer from Kiato"

"पुन्हा KT आणि तेहि onsite ला????"
"yes आणि तेहि hands on experince सकट..Kiato बरोबर"

"हा हा हा हा...बन्या बज गया तेरा बैंड बाजा"

"i know"

"you know what.....I feel that you really need this?"

"what?"

"best of luck........."

मंगळवार, १२ मे, २००९

8.Appraisal

आज बन्याची स्वारी डायरेक्ट माझ्या डेस्क वरच आली. मी mails चेक करत होतो तर हा धापा टाकत आला।
"hiiii, आज सकाळी सकाळी माझ्या डेस्क वर दौरा?"
"हा ना यार. चहा प्यायला चल ना"
"ओके . चल"

आम्ही चहा घेउन कट्ट्यावर जाऊन बसलो
"तू कालचं मेल वाचलं का?"
"कोणतं?"
"ते appraisal चं"
"नाही. मला तर असं काही मेल नाही आलं. मी ह्या वेळेसच्या yearly appraisal cycle मध्ये येत नाहीये"
"ओह. तुझं पण माझ्या सारखाच झाला म्हणजे"
"म्हणजे"
"अरे मी पण लास्ट इयर च्या appraisal cycle मध्ये नव्हतो"
"ओके"
"पण ह्यावेळेसच्या appraisal cycle मध्ये आहे"
"मग?"
"मग काय .कसं भरायचं ते appraisal?"
"कसं म्हणजे? तू काय कधी appraisal भरलं नाहीये का?"
"नाही ना . तोच तर प्रॉब्लम आहे. मी आधीची कंपनी १ वर्षात सोडली. त्यामुळे तिथे माझे appraisal झालं नाही. ही join केली तेव्हा त्यांचे appraisal चालू होते. त्यात मला घेतलं नाही.त्यामुळे हेच माझे पाहिले appraisal आहे"
"ओह अस्सं आहे तर. ठीक आहे काळजी कशाला करतोस"
"तू फॉर्म पहिला का? किती danger आहे. Goals and objectives भरायचे आहेत आणि त्यावर comments"
"so?"
"so??? कुठून आणू ते Goals and objectives?"
"काही sample template असेल ना intranet वर"
"नाहीये ना.त्यात लिहिलं आहे की मेनेजर देइन तुम्हाला "
"मग , माग ना त्या "सिल्व्या" कड़े "
"ती म्हणाली कोणाकडून तरी घ्या. आता तिला माझे काय Goals expected आहेत हे मला कसं कळणार? मला तर स्वतःचे काही Goals सुचतच नाहीयेत"
"ओके. मग असं कोणाला तरी शोधुया ज्याचं लास्ट इयर चं appraisal इथेच झालं असेल. what do you say?"
"हं तसच करुया. मला एक जण माहित आहे. माझ्या बाजुच्या टीम मध्ये आहे. तो ३ वर्षां पासून इथेच आहे"
"सही आहे. जबरदस्त patience दिसत आहेत त्याच्यामाधे. काय नाव त्याचं?"
"गुंजन"
"फ़िर देर किस बात की? lets attack him॥"
.............................................

आम्ही गुंजन च्या डेस्क वरच गेलो. बन्याला full competition देत एक अतिशय गलेलठ्ठ मुलगा yahoo messenger वर चाट करत बसला होता

"hii गुंजन. क्या हाल है"
"सब बढ़िया है. तू बोल"
"चल रहा है. यह मेरा दोस्त है "मकरंद""
"hii. nice to meet you. Annual day मे back स्टेज पे तुने बहोत काम किया था ना "

में नुसताच हसलो.
बन्याने मुळ विषयाला हाथ घातला
"एक हेल्प चाहिए थी यार"
"बोल ना"
"तुम्हारे पास कोई goals and objectives का template है क्या ?"
"हां है ना .पुरी कंपनी एकही template use करती है. सदियोंसे यही goals and objectives इधर use होते है"
"अछा?"
"तू वो template के चक्कर में मुझसे मिलने आया क्या. वो तो तेरेको कोई भी दे देता"
"मैंने सोचा तुम्हे ३ साल complete हुए है तो मुजे appraisal में थोड़ा guidance मिलेगा"
"हा हा हा.जले पे नमक छिड़क रहा है क्या? "
"नही यार "
"तू appraisal की चिंता मत कर. वैसेभी तेरी वजह से कंपनी को कोई फरक पड़ने नही वाला. first floor पे जो प्रोजेक्ट चल रहा है उससे कंपनी को ७०% revenue आता है. performance की चिंता उन लोगों को करनी चाहिए. तेरा प्रोजेक्ट तो ऐसेभी कंपनी को सालोतक चलानाही है.तू appraisal नही भी भरेगा ना तो भी तेरेको reasonable hike और ठीक ठाक रेटिंग मिलेगा"
"सही है यार.तुझे तो सब पता है"
"फ़िर ऐसेही ३ साल नही निकले कंपनी में"
"तेरी क्या हर साल अछी hike होती है?"
"कोई भी कंपनी में अछी hike नही होती है"
"फ़िर तुम ३ साल इधर ही कैसे रहे?"
"उसकी लम्बी स्टोरी है. join किया तब १ महिना मुझे बेंच पे ड़ाल दिया. फ़िर मुझे १ महिना technical ट्रेनिंग करवाया. मुझे लगा कोई प्रोजेक्ट requirement होगी. पर वैसा नही था. next ३ महीने में मैंने almost हर client के interview दिए लेकिन किसीने मुझे नही लिया. मैं तो उस टाइम ही कंपनी छोड़ देता. मैंने जैसेही बाहर interview देने का सोचा वैसेही मुझे एक प्रोजेक्ट allocate हो गया. मैंने सोचा ४/५ महीने काम कर लूँ तो एक साल इधर पुरा हो जाएगा. फ़िर CV में भी ok sort of impression आता है . जैसेही १ साल पुरा होने को आया वैसेही मेरा H1 process करना initiate हो गया. H1 के चक्कर में १ साल और इधर रुका. फ़िर २ महीने onsite के इंतजार में और फ़िर ४ महीने US में मैंने बिताये. अब ६ months bond ख़तम होने का इंतजार कर रहा हूँ. ऐसे ३ साल चले गए और यह ३ साल completion वाला certificate डेस्क पे चिपकाके बैठा हूँ"
"ओह"

त्याची स्टोरी ऐकून मी आणि बन्या विचारताच पडलो. मी बरया पैकी position मध्ये होतो पण बन्याची हालत थोडी फार अशीच होती. गुंजन ने लगेच Goals and Objectives चे template आम्हाला forward केले।

"यह ले मेरा last year का भरा हुवा फॉर्म है.थोड़ा alteration करके भर दे इसको और भेज दे वो मोटी को. वैसेभी वो dumbo सबका appraisal एक जैसाही कराती है"
"तुझे कैसे पता"
"मैंने onsite से पहेले तेरे प्रोजेक्ट में ही काम किया था "
"वो discussion में क्या क्या बोलती है"
"देख अगर वो चाहती है की तू उसके प्रोजेक्ट में काम करे तो out of ५ वो ४ sentence तेरी तारीफ में बोलेगी.अगर वो चाहती है की तू प्रोजेक्ट से रिलीज़ मांगे तो वो तेरी सिर्फ़ बुराई करेगी. अगर तेरे प्रोजेक्ट में रेहेनेसे या ना रेहेनेसे उसको कोई फरक नही पड़ता तो वो तेरेसे फालतू discussion करेगी.ना तो ख़ुद कुछ important बोलेगी ना तुझे अपने concerns बोलने देगी"
"अछा "
"टेंशन मत ले. भर दे तेरा फॉर्म. और कोई हेल्प चाहिए तो बता"
"no, thanks a lot for this"
"अरी कोई नही. चलता है"
........
बन्याने ने appraisal भरले आणि त्याचे "सिल्व्या" बरोबर डिस्कशन पण झाले. डिस्कशन करुन तो लगेच मला चहा प्यायला घेउन गेला. बन्या फारच खुश दिसत होता

"काय रे? "सिल्व्या" ने तुझं खुप कौतुक केलं असं दिसते"
"अरे मग. सगळं काही चांगलं बोलली. that means she requires me in this project. मला माझे concerns, aspirations सगळं काही विचारले तिने"
"सही आहे"
"हा ना. बहुतेक मला चांगलं रेटिंग आणि hike मिळेल असं वाटते"

आम्ही बोलतच होतो तोच मागुन "गुंजन" ने बन्याच्या पाठीवर थाप मारली

"क्या बन्या. कैसा है?"
"अरे अछा हुवा तुम इधर ही मिल गए. अभी appraisal का डिस्कशन करके आया हून. सही रहा सब"
"congrats"
"thanks to you"
"thanks to me नही "बाला" बोल"
"बाला कृष्णन?"
"हाँ वही"
"जो मेरे प्रोजेक्ट में है वो बाला?"
"हाँ वही यार"
"उसको क्यों?"
"उसने last week resign किया है"
"तो?"
"तो २४ * ७ support के लिए तेरेसे अछा "most eligible bachalor" सिल्व्या को और कहा मिलने वाला है?"
"क्या??? मैं नही समझा"
"तेरे प्रोजेक्ट में वही एक बंदा तो काम करता था. इसलिए बाकी लोग मजे करते थे. अब तू काम करेगा और बाकी लोग मजे करेंगे"
"क्या???"
"वो देख बाला आगया. तू ख़ुद ही उसको पूछ ले"
................................

"whats happening?"
"we were just talking about you"
"wow. it seems i have become a very hot topic here"

बन्या एकदम टेंशन मध्येच आला. बाला खरोखरीच key resource होता. आणि मुख्य म्हणजे client शी त्याचा खुप चांगला rapport झाला होता. त्याचा रिप्लेसमेंट होणं म्हणजे खरच कठिन काम होतं. बन्याला खुपच मेहेनत करावी लागणार होती।

"when is your last day?"
"not fixed yet. but i am planning to finish KT in 1 week so that they can relive me in another 2 weeks at the max"
"what? you will give me KT only for 1 week?"

बन्याला टेंशन देऊन "गुंजन" आणि "बाला" हसत होते. मला चाहुल लागली की बन्याचे next week पासून "बुरे दिन" सुरु होणार आहेत

जाता जाता बाला म्हणाला
"dont take tension man. Take your laggage to office for next full week. we will finish your KT in 1 week"
"what???"
"see you soon in KT"...............

सोमवार, १३ एप्रिल, २००९

7.डायरी

आज मला काही कामच नव्हतं.नुकताच annual day झाला होता त्यामुळे सगळेच जण आरामात होते.तेवढ्यात माझा फ़ोन वाजलाच.मी काही बोलायच्या आतच पलीकडून बन्याचा आवाज आला

"काय करतोस?"
"काही नाही.मेल्स चेक करत आहे"
"चहा ला येतोस?"

मी पण टाइम पास साठी काहीतरी पाहतच होतो।
"चल. ये कैफेटेरिया त "

मी तिथे पोहोचायच्या आधीच साहेब तिथे हजर
"काय म्हणतोय आकांक्षा ग्रुप च हीरो?"
"अरे काही नाही यार.असाच टाइमपास चालु आहे.माझा प्रोजेक्ट असाही असून नसल्यासारखाच आहे.काय करावं सुचत नाही आणि आता annual day पण नाही टाइमपास ला"
"इट्स ओके यार.मिळेल काही ना काही. मलाही आज काही काम नाहीये"
आम्ही चहा घेउन आमच्या नेहेमीच्या कट्ट्यावर बसलो.
"मक्या , एक सांग तू कधी डायरी लिहिली आहे?"
"नाही बाबा.का?"
"अरे असच मला वाटलं की डायरी लिहावी.आपले अनुभव डायरीत लिहून ठेवावे"
"Thats a good idea पण अचानक हे डायरी चं खुळ तुझ्या डोक्यात कसं आलं?"
"असच"
"खरं सांग कोणी भरवलं हे खुळ तुझ्या डोक्यात"
"अरे खरच कोणी नाही.माझ्याच मनात आलं"
"अच्छा.मग लिही की डायरी.त्यात मला विचारण्यासारखं काय आहे?"
"कशी लिहायची डायरी"
"में लहानपणी कुठेतरी वाचलेलं आठवतय की रोज जे जे काही होतं ते ते लिहून ठेवायचं आणि ही डायरी कोणाच्या हाताला लागू द्यायची नाही .पण ती आपल्या अपरोक्ष कोणीतरी गुपचुप वाचावी अशी इच्छा मात्र ठेवायची.ती अशा जागी ठेवायची की लगेच सापडली पाहिजे अणि लगेच कोणीतरी वाचली पाहिजे"
"तू माझी टिंगल करत आहेस?"
"हा हा हा नाही यार खरच.प्रत्येक माणसाला असच वाटत असतं.नाहीतर आपण पिक्चर मध्ये डायरी आणि त्यावरून घडलेला पिक्चर उगाच पाहिला असता का?"
"पण मी माझी डायरी कोणालाच वाचायला देणार नाही"
"मग तिचा काय उपयोग?"
थोड़ा विचार केल्यासारखं करून बन्या म्हणाला
"yea..actually मग डायरीचा काय उपयोग?"
"अरे एवढा विचार काय करतोस.तू आधी डायरी तर लिही.मग पाहू"
"हो ना पहिले एक डायरी विकत आणली पाहिजे"
............................
बन्याने त्याच दिवशी डायरी विकत आणली आणि रात्रीच डायरी लिहायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला भेटला तेव्हा त्याला विचारले
"काय मग लिहिली का काल डायरी"
"हो,मग समजलास काय मला.एकदम मस्त लिहिली"
"wow...keep it up"

त्यानंतर बन्या ३/४ दिवस भलताच खुश होता. त्याने सलग ५ दिवस डायरी लिहिली होती. बन्याचा हा उत्साह किती दिवस टिकणार आहे ह्याबद्दल मला शंका होतीच. सन्डे ला त्याचा फ़ोन आला
"काय करतोस?"
"काहीच नाही आत्ताच उठालो.तू काय करतोस?"
"काही नाही.आता काय करणार मी.सगळं संपलं आहे"
"what? काय संपलं आहे?"
"काही नाही रे.मूवी ला येतोस?"
"ओके.मी येतो तुझ्या रूम वर.मग जाउया"
"ओके"

में त्याच्या रूम वर गेलो तर जणू देवदास ची खोली असावी अशी अस्ताव्यस्त पसरली होती.
"हे काय तू अजुन असाच?"
"असाच म्हणजे?"
"आवरलं का नाही.लगेच निघालो असतो"
"आवरतो.तू बस मी आंघोळ करून येतो"

मी स्वतः साठी थोडीशी जागा करून घेतली आणि गादी वर बसलो.पाहतो तर काय शेजारीच बन्याची डायरी. माझ्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली.म्हणजे ह्याने ही डायरी मी वाचावी म्हणूनच इथे ठेवली आहे. मी लगेच ती डायरी उचलली आणि पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली.

पहिल्या पानावर right साइड च्या कोपऱ्यात सुंदर अक्षरात नाव घातले होते."अमोल कुलकर्णी".बन्याचे अक्षर फारच छान होते.हा पोरगा शाळेत एक गुणी पोरगा असेल बहुदा.

मी पान उलटले
"१३/७/२००४

काल आकांक्षा सहज बोलून गेली आणि मी डायरी विकत पण आणली.मी डायरी लिहित आहे ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. केवल तुझ्यासाठीच मी डायरी आणली.तू काय लिहितेस डायारित?उदया तुला विचारतो"
--

ओह्हो म्हणजे ती ग्रुप च्या नावाची खरी खरी पोरगी ह्याला भेटली आणि तिनेच त्याला डायरी लिहायला बसवलं. सही है भिडू. मी लगेच पुढचे पान उलटले

"१४/७/२००४

आज आकांक्षा ने पिंक ड्रेस घातला होता.किती सुंदर दिसत होती.हसते पण किती गोड. पण ती जेवायला QA ग्रुप बरोबर जाते.मी उदया तिला लंच ला invite केलं तर ती येइल का?
--
ओह्हो म्हणजे ह्याच्या टीम मध्ये QA मध्ये ही आकांक्षा आहे तर

"१५/७/२००४

आज आमची टीम मीटिंग झाली आणि मेनेजर तिच्यावर जाम भडकली. तय "सिल्व्या" ला गोळ्याच घातल्या पाहिजे.बाकीचे इतके लोक आहेत ना QA मध्ये, ते करतील काम.कशी म्हणाली "आकांक्षाने सर्वात कमी bugs काढले आहेत". किती नर्वस झाली होती आकांक्षा. bugs शोधत बसली होती नंतर. माझा लंच चा प्लान चौपट झाला."
--

बन्याच्या अक्षराला काय झालं? पहिल्या पानावर तर चांगलं होतं...


"१६/७/२००४
किती खुश होती माझी bugs बनी आज.काल भरपूर टेस्टिंग केल्यामुळे "सिल्व्या" एकदम खुश झाली होती and so bugs बनी सुद्धा. आता मी तिला उदया लंच ला विचारातोच. की saturaday ला मूवी, डिनर असं विचारू?"

--
नाव तरी काय ठेवलं आहे bugs बनी म्हणे

"१७/७/२००४

बिचारी bugs बनी.किती ताप भरला आज तिला. ती म्हणाली बस येइपर्यंत माझ्याबरोबर बस स्टाँप वर उभा रहा. पण उगाच तिला काही झालं तर. मी तिला घरापर्यंत सोडायला गेलो तेव्हा पण तिला खुप बरं वाटत नव्हतं. तिला डॉ कड़े घेउन गेलो आणि औषधं पण आणून दिली.मला कसं म्हणते "monday ला पैसे देइन"
मी कसं सांगू तिला.नको देउस गं पैसे.पैसे तुझ्यापेक्षा important थोडीच आहेत? उदया तिला surprise घरीच भेटायला जातो"

--

म्हणजे काल बन्या खरच तिला भेटायला गेला होता की काय

"१८/७/२००४
किती खोटारडी आहे ती.चांगली बरी होती.बॉय फ्रेंड बरोबर बाहेर चालली होती.मला ओळख पण करुन दिली. तो पण म्हणतो कसा "Thanks for helping her".
चक्का हसत हसत निघून गेले दोघं....मी एकटाच वेड्यासारखा तिथे उभा.गेली उड़त ती आकांक्षा"
....................
बन्याच्या अक्षराची पूर्ण वाट लागली होती. एखाद्या झुरळाला ink मध्ये बुडवून कागदावर चालवल्यास कसं अक्षर येइल तसं लिहिलं होतं पठ्याने

---

"वाचलिस डायरी ?"
"अरे सही timing आहे तुझं बन्या. अगदी मी लास्ट पेज वाचायला आणि तू बाहेर यायला एकच वेळ झाली"
"what do you mean ?"
"nothing. but i am sure about one thing"
"what?"
"तू आजपासून काही डायरी लिहिणार नाहीस. This is the last page in your diary?"

सगळं काही clear झालं होतं.बन्याकडे लपवण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं आणि सांगण्यासारखं मी already वाचून काढलं होतं.

..............

monday ला सकाळीच बन्याचा चहा साठी फ़ोन आला. आम्ही चहा घेउन आमच्या नेहेमीच्या कट्ट्यावर बसलो
"मक्या एक सांग"
"बोला"
"तू कधी blogs लिहिले आहेत?"

again?????nooooooooooooo

6.Annual day - part 2

सगळी तयारी झालीच होती .आदल्या दिवशीच उद्याच्या कार्यक्रमाची "रंगीत तालीम" घेण्यात आली होती. पहिलं गाणं "वाणी" ची "गणेश वंदना" तर दुसरं "वाणी आणि लक्ष्मी" चे "duet song".तिसरा नंबर बन्याचा होता आणि नंतर बाकी सगळे. दुपारी ४ वाजता ऑफिस च्या बसेस सगळ्यांना घेउन "The grand Ashoka" ला जाणार होत्या.ठरल्याप्रमाणे सगळं घडत होतं पण बन्या अजुन ऑफिस लाच पोहोचला नव्हता. जो येतो तो बन्या विषयीच विचारत होता.अजुन कसा आला नाही हा पोरगा म्हणुन मी त्याला फ़ोन लावला

"कुठे आहेस? कधी पोहोचणार?"
"हो हो निघतोच आहे"
"ओके लवकर ये.सगळे वाट पाहत आहेत तुझी"
"हो १५ मिनिटात पोहोचतो.रस्त्यातच आहे"
"ओके"

मी आणि सचिन pantry मध्ये चहा पीत होतो तेवढ्यात बन्या आलाच

"तुझ्या डोळ्याला काय झाले?"
"अरे यार काहीतरी चावलं रस्त्यात"
"गाडीवर असतांना?"
"हो"
"हेलमेट कुठे गेलं तुझं?"
"तुझा फ़ोन आला ना तेव्हा काढलं होतं"
"ओह, बराच लाल झाला आहे तुझा डोळा"
"हाना , फार चुर्चुरत आहे. जरा धुवून येतो"

बन्याचा डावा डोळा चांगलाच लाल झाला होता.जरावेळाने डोळ्याभोवती सूज पण जाणवू लागली होती.डोळयामधुन continous पाणी येत असल्यामुळे बन्या लास्ट टाइम रिहलसल वर पण concentrate करू शकत नव्हता.तासाभरात त्याचा डोळा टम्मं सुजला.

"यार मक्या , मी काही गाणं म्हणु शकणार नाही. फारच दुखतोय डोळा"
"एकदा डॉक्टर कड़े जाऊन दाखवू या. i होप काही severe नसावं"

मी त्याला डॉक्टर कड़े घेउन गेलो. त्यांनी बन्याला "eye drops" दिले आणि सांगितलं की २/३ दिवसात बरं होइल.काय तर त्याला एक बारीकसा कीडा चावला होता.

"हा कीडा पण आजच चावायाचा होता"
"जाउदे यार. आता चावल्यानंतर काय करणार"
"तेहि खरच आहे म्हणा"
"चल ऑफिस ला जाउया.तू एकदा final प्रँक्टिस कर आणि डायरेक्ट main प्रोग्रामलाच गाणं म्हण"
"हं"

ऑफिस ला पोहोचल्यावर बन्या गाणंच म्हणायला तयार होत नव्हता.बन्या गाणार नाही म्हटल्यावर सगळ्यांचाच मूड ऑफ़ झाला होता.आखिर बन्या "आकांक्षा ग्रुप" की जान होता.guitar वाला म्हणाला "for your song only i have brought this new guitar from my friend".
अतुल म्हणाला "तुझ्या शिवाय तर प्रोग्राम मध्ये जानच नाहीये काही.आम्हाला काही कन्नड़ गाण्यात इंटेरेस्ट नाहीये".तरी पण बन्या ऐकेच ना.शेवटी "दिव्या" म्हणाली "Without you , there is no enthu at all in "Akanksha"".मग मात्र लगेच बन्याची कलि खुलली आणि तो सुजलेल्या डोळ्याला पर विसरून गेला.
..........
"The Grand Ashoka" ला निघेपर्यंत बन्याची सूज पार गालावर उतरली होती.असा सुजलेला बन्या फारच भयंकर दिसत होता.सचिन ने बन्याला black गौगल दिला.तरी सुध्धा सूज काही लपत नव्हतीच.पाहिले फालतू "presentations" झाल्यावर "आकांक्षा"च्या प्रोग्राम ला सुरुवात झाली. अजस्त्र "अन्जेलो" ने सूत्र संचालानस सुरुवात केली.
"Ladies and Gentleman....."

अखेर बन्या च नंबर आला आणि तो सगल्या पब्लिक समोर स्टेज वर उभा राहिला. offwhite सलवार कुरता , डोळ्यावर काळा गौगल आणि हातात माइक.स्टेज वर बन्या उभा राहिला आणि धडधड माझ्याच छातीत सुरु झाली. मी बैक स्टेज ला जाऊन पाहिले आणि "लक्ष्मी" च्या हातात माइक नाही ना ह्याची खात्री करून घेतली.ह्याच्या हातात माइक सापडला तर तो "ला ला ला ला" गायल्याशिवाय काही राहणार नाही ह्याची मला खात्री होती.पण Thank God "लक्ष्मी" कड़े माइक नव्हता. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि कान देऊन ऐकू लागलो. सुरुवातीची guitar वाजायला लागली.synthesizer ने रणशिंगं फुंकले आणि एक ठरवलेल्या drumer च्या ठोक्यावर बन्याने गायला सुरुवात केली

"नीले नीले अम्बर पर....चाँद जब आए"
"हमको तरसाए ...प्यार बरसाए"

चला सुरुवात तर चांगली झाली.

"ऊँचे ऊँचे परबत जब चुमते है अम्बर को"
"प्यासा प्यासा अम्बर जब चूमता है सागर को" ......

ऊँचे ऊँचे परबत अकस्मात् इतके उंच गेले की पुढच्या ओळीला पण खालीच आले नाहीत आणि synthesizer धपकन खाली पडला.त्याला सांभाळायला drumer गेला पण तो भलतिकडेच जाऊन कोलमडला.चाणाक्ष बन्याला जशी त्याची चुक कळाली तशी त्याने डिरेक्ट दरीतच उडी मारली

"प्यार मी कसने को, बाहोमे बसने को"
"मेरा मन ललचाये कोई तो अजाए"

खाली गेलेला synthesiser वरती यायला निघाला नि पुन्हा drumer शी त्याची चुकामुक झाली.पण बन्या हिम्मत हरला नाही

"ऐसा कोई साथी हो..ऐसा कोई प्रेमी हो..प्यास दिल की बुझा जाए...."
"नीले नीले अम्बर पर......"
...............

अखेर ते शेवटचं मूळ गाण्यात असलेलं "ला ला ला ला" झालं आणि बन्याचं गाणं संपलं.

"चित्रा' चं "यह मेरा दिल" पण झालं आणि violine, बासरी , तबला सगळं काही सुरळित पार पडलं.

"आकांक्षा ग्रुप" डिनर हॉल मध्ये एक बाजूला बऱ्याच खुर्च्या एकत्र टाकुन बसला होता आणि सगळ्यांच्या मध्ये होता गौगल वाला बन्या.जो तो येउन त्याला "wel sung...... good.......very nice' म्हणत होते आणि बन्या "thanks" म्हणत एन्जॉय करत होता. त्याच्याकडे पाहून मला "दिव्या"चेच शब्द आठवत होते "Without you , there is no enthu at all in "Akanksha"".

घोळक्यातून बन्याचे लक्ष माझ्याकडे गेले. त्याने मला खुणेनेच विचारले
"कसं झालं गाणं?
मी खुणेनेच त्याला सांगितले
"Wel done"

शनिवार, २१ फेब्रुवारी, २००९

5.Annual day - Part 1

दर वर्षी प्रमाणे येणारा annual day महिन्या भरावर येउन ठेपला होता.ज्याना "काम करणारे" अणि "काम न करणारे" resource manage करायचे असतात अश्या Resource manage ग्रुप ने ह्या वर्षीच्या "Annual day" साठी एक नविन टुम काढली. कंपनी चा स्वतः च ऑर्केस्ट्रा. त्यांनी जिकडे तिकडे मोठे मोठे पोस्टर्स लावून ठेवले "Promoting Hidden Talent". ही पोस्टर्स पाहून स्वारी माझ्याकडे आली.

"ए मक्या , जायचं का ऑर्केस्ट्रा मध्ये?"
"नाही बाबा, आपल्याला काही येत नाही गाणं बिणं. आणि तसही ते काही फार ग्रेट नसणारच आहे.फुकट मंडळीँनी स्वतः च्या टाइम पास साठी केलेला उद्योग आहे हा"
"तू असं कसं बोलू शकतोस? they are searching hidden talent"
'and do you think you have that?"
"obviously"
"मग तू जा बिनधास्त. मी तुझ्या पाठीशी आहे"
"मी सिंगर च्या ऑडिशन ला जाणार आहे"
"ok so?"
"so???? तू निदान मला cheer up करायला तरी चल"


"मी काय म्हणतो, तू सेलेक्ट झाला की मी येइन ना cheer up करायला"
"anyway मी सचिन अणि अतुल ला विचारतो"


ते दोघाही प्रोजेक्ट मध्ये असून नसल्या सारखेच होते त्यामुळे हे तिघे लगेच ऑडिशन ला गेले.आणि आश्चर्य म्हणजे बनया सेलेक्ट पण झाला.माझ्या मानत विचार आला "बन्या खरच चांगलं गाणं म्हणत असेल का? मीटिंग मध्ये जाऊन पहायला काय हरकत आहे?"

शेवटी में ग्रुप मीटिंग मध्ये गेलोच. मी ज्या मीटिंग मध्ये गेलो त्या मध्ये ग्रुप चं नाव ठरवण्यात येणार होते. HR आणि RMG दोन्ही डिपार्टमेन्ट फारच उत्साह दाखवत होती. ग्रुप ची लीड मेंबर होती Human Resource ची "दिव्या" आणि त्या खालोखाल Resource Manage Group ची "चित्रा".त्या दोघींनी सगळ्यांना आपापल्या आवडीची नावं suggest करायला सांगितली होती आणि आज त्यातून ग्रुप चे नाव ठरणार होते.

बन्याने त्याची लिस्ट वाचायला सुरुवात केली
"दिशा, मनीषा , आकांक्षा , मानसी ......."
बन्या व्यतिरिक्त अजुनही बऱ्याच मुलांच्या लिस्ट मध्ये २ ४ नावं common निघाली. तर मुलींच्या लिस्ट मध्ये "आकाश , क्षितिज , परिचय ..." अशी नावं होती.
सर्वानुमते "आकांक्षा" हे नाव फायनल झालं।"ही मुलगी कोण आहे मला शोधलाच पाहिजे". असो

"आकांक्षा" ग्रुप ने अखेर नारळ फोडला. एक drummer, एक synthesizer player आणि एक तबला वादक अश्या लिमिटेड instruments मध्ये ८ १० singers आणि माझ्यासारखे १० १२ "बघे" or back stage helpers अश्या सगाळ्यांनी मिळून प्रँक्टिस सुरु केली.

चित्रा ने "ये मेरा दिल" गाणं निवडलं. कन्नड़ चित्रा हे गाणं अश्या प्रकारे म्हणत होती की जर "आशा भोसले" ने ऐकलं असतं तर चक्करच येउन पडली असती आणि "हेलन" ने ऐकलं असतं तर पायात पाय अड़कुन पडली असती."संजय" ने सोनू निगम पकडला तर "अर्शदीप सिंघ' ने "सुखविंदर सिंघ" पकडला."कावना" हाथ धुवून "लता मंगेशकर"च्या मागे लागली तर बन्या ने direct "किशोर कुमार"चाच गळा पकडला.
गाणं तरी काय भारी निवडलं "नीले नीले अम्बर पर चाँद जब आए.."

२ ३ दिवसांपासून कंपनीतली अनुभवी मंडळी कोणीतरी "लक्ष्मी" ची वाट पाहत होती."लक्ष्मी" आणि "वाणी" कोणतं तरी "duet" म्हणणार होते"."वाणी" बऱ्या पैकी चांगलं गाणं म्हणत होती त्यामुळे "लक्ष्मी" पण चांगलच गाणं म्हणनारी असावी असं मला वाटलं". माझा अंदाज बरोबरच निघाला फक्त "लक्ष्मी" ती नाही तर "तो" होता.ह्या दोघांचे हे "कन्नड़ duet" सोडले तर बन्याच लीड सिंगर होता.आमच्या सोनू निगम आणि सुखविंदर बद्दल तर न बोललेलेच बरे.

बन्या ने गाणं म्हणायला सुरुवात केलि "नीले नीले अम्बर पर" पण भट्टी काही जमेनाच तेव्हा अतुल च्या लक्ष्यात आलं की आपल्याकडे guitar च नाहीये. तो बिचारा ओरडून सांगू लागला
"guitar ही ह्या गाण्यातली neccessity आहे. Either find a guitar player or search for another song।"

बन्या मात्र ह्याच गाण्यावर अडून बसला.शेवटी शोधून शोधून एकदाचा guitar प्लेयर मिळाला आणि प्रँक्टिस पुन्हा सुरु झाली.बन्या "गाण्याच्या पट्टी" मध्ये असा काही वर खाली होत होता की माझा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खालीच राहत होता. कही केल्या बन्या , synthesizer आणि guitar syncronise होतच नव्हते.शेवटी"लक्ष्मी" बन्याच्या मदतीला धावला. "लक्ष्मी" ला गाण्याची चांगलीच जाण होती पण त्याचा "लैंगुएज प्रॉब्लम" होता.त्याला हिन्दी येत नव्हते. मग त्यानेच एक शक्कल काढली.बन्या हिन्दी गायचा आणि तो फ़क्त tune गायचा.
बन्याने "नीले नीले अम्बर पर" सुरु केले की "लक्ष्मी" त्याच्या बरोबर गायचा "ला ला ला ला"

अशी मदत "लक्ष्मी" सगळ्यांनाच करत होता त्यामुळे सबंध प्रँक्टिस मध्ये फक्त त्याचं "साउथ इंडियन" accent मधला "ला ला ला ला" असच ऐकू यायचं.सचिन मला म्हणाला
"हा काही ला ला ला सोडणार नाही".
"लक्ष्मी" ला ला ला करायला लागला की बन्याचा चेहरा एवढासा होऊन जायचा आणि "नीले नीले अम्बर" भलतेच कुठेतरी निघून जायचे.पण चिगट "लक्ष्मी" त्याचा "ला ला ला' काही सोडत नव्हता.

रोज ट्रेनिंग रूम मध्ये चालणारी प्रक्टिस पाहून कंपनीतल्या अजुनही बऱ्याच जणांना उत्साह आला. आपल्यात काहीतरी Hidden Talent आहे असं ज्याला त्याला वाटू लागलं."अरुण" ने डायरेक्ट आमच्या तब्बलजीलाच आव्हान केलं त्यामुले त्या दोघांची ५ मिनिटांची "तबला जुगलबंदी" ठेवण्यात अली.एका माणसाला "violine" परफॉर्मेंस द्यायची इच्छा झाली तर एकला "बासरी" वजवयाची.एक मुलगी तर चक्क "माझा भरतनाट्यम ठेवा" असं पण म्हणू लागली."दिव्या" ने कसं बसं तिला "we will keep dance performances in next program" असं सांगुन कटवलं.

एवढे जास्त "talents" झाल्यामुले आमच्या च्या प्रोग्राम ची पूर्वीची वेळ वाढवुन पूर्ण ४५ मिनिटांचा प्रोग्राम तयार झाला.त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रोग्राम चं 'सूत्र सञ्चालन" करायची गरज भासु लागली. अखेर "अन्जेलो" ने ती जबाबदारी स्वीकारली. त्याच्या "अस्खलित मल्ल्यालम इंग्लिश" मध्ये त्याने "anchoring" ची प्रक्टिस सुरु केलि.

अखेर तो "D डे" उजाडला.

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २००९

4.बन्याची बॉडी

काही गोष्टी घडायला देव नेमकी एकच वेळ कशी ठरवतो ह्याचे मला नेहेमीच आश्चर्य वाटते. काही शहाणी मंडळी ह्याला योगायोग म्हणतात.तर सांगायची गोष्ट अशी की अशाच योगायोगाने काही गोष्टी वेगाने घडल्या.
बनया आधी ऑफिस च्या जवळ रहायचा तो जरा लांब म्हणजे ५ km अंतरावर रहायला गेला.त्याला नविन जागेपसून सिटी बस ने ऑफिस ला येणं जाणं कष्टप्रद वाटू लागले अणि ऑफिस बस ने पैसे जास्त वाटू लागले.एकूण काय तर त्याला २ व्हीलर घ्यायला कारण मिळाले. आता कोणती गाड़ी घ्यावी हे बऱ्याच गाड्या चालवून पहिल्या नंतर पक्के झाले. बजाज pulsor त्याने निश्चित केली.आता तो केवढा ती pulsor केवढी, काही तुलना आहे की नाही.तरी हा आपला pulsor वरच अडून बसला.
black pulsor घेउन तो जेव्हा ऑफिस ला आला तेव्हा मला हसुच अवरेना.एवढ्या मोठ्या pulsor वर एवढा छोटुसा मुलगा बसलेला कल्पना करा किती मजेदार वाटत असेल।

अशीच एक दूसरी घडलेली गोष्ट म्हणजे माझं onsite जाणं. मला कंपनी ३ महिन्यांसाठी US ला पाठवणार अशी बातमी अली.माझा वीसा तयारच असल्यामुळे लगेचच दुसरया आठवड्यात मी US ला जायला निघणार होतो. त्यामुळे बन्याच्य़ा pulsor च सहवास मला फारच कमी मिळाला.
ह्या मधे अजुन एक वेगाने घडलेली गोष्ट म्हणजे बन्याच्या प्रोजेक्ट मध्ये एक नविन मुलगा जोइन झाला.त्याचे नाव अबू. अबू च्या बोलक्या स्वभावामुळे बन्या आणि तो लगेचच चांगले मित्र बनले।

मी US ला पोहोचलो अणि कामत गर्क झालो. इकडे बन्या आणि अबू प्रोजेक्ट मधे धमाल करत होते.अबू मुस्लिम असल्यामुळे नॉन वेज खाण्यात पटाईत होता.तसा बन्या पण नॉन वेज च फँन होता.मग काय विचरता.बन्याची pulsor रोज दुपारी लंचला ह्या दोघाना घेउन KFC मध्ये जाऊ लागली.४० रुपयाचे नॉन वेज कॉम्बो दोघेही चवीने खाऊ लागले.अबू ला लहानपणापासून नॉन वेज खाण्याची सवय होती त्यामुळे तो जसा होता तसाच राहिला पण बनया मात्र हळुहळु वाढू लागला.
एकदा ऑनलाइन chatting करताना बन्या म्हणाला
"अरे जरा वजन वाढलय.आत्ताच कंट्रोल करायला पाहिजे"
ह्या हाडकुळया मुलाचे वजन वाढून वाढून असे किती वाढणार म्हणा.पण मी साफ़ चुकीची कल्पना केलि होती हे मी आल्यावर प्रत्यक्ष पाहिल्यावर जाणवला.तसा मी पण ३ ४ किलो ने वाढलो होतो पण बन्या ने मात्र कमालच केलि होती त्याची वाढ म्हणजे जणू वाढता वाढता वाढे भेदिले शुन्य मंडळा
मी त्याला बघून थक्कच झालो.त्याने जवळपास १० ते १५ किलो वजन धारण केले होते.त्याचा हाडकुळा लुक जाऊँन एका सुध्रृढ बालकाचा लुक आला होता.
"तू इतका कसा काय जाडा झालास????" मी पहिला प्रश्न हच विचारला
"अरे मी नाही का रोज KFc मध्ये नॉन वेज कॉम्बो खात होतो"
"पण तरीही इतका जाड़ म्हणजे कमालच आहे तुझी"
"हाना यार,pant तर सोड मला शर्ट पण होत नाहीयेत"
"मग आता के करतोस लंच चे"
"मी इथेच कैंटीन मध्ये खातो आणि अबू बाहेर जातो. पण नुसता कमी खाउन वजन कमी होइल असं वाटत नाही.काहीतरी करायला पाहिजे"
"जिम जोइन कर"
"मी पण तोच विचार करत आहे"
"मग नुसता विचार किती दिवस करणार आहेस.लवकर जोइन तरी कर"

अशी टाळाटाळ करत बन्याने एक दिवस जिम जोइन केले.३ months १०००० Rs .आठवड्यातून any ५ days.एका शनिवारी भल्या सकाळी ९ वाजता त्याने मला फ़ोन केला
"गुड मोर्निंग"

खरा तर माझी मोर्निंग अजुन झालीच नव्हती पण त्याचा उत्साही आवाज ऐकून मी पण आपला म्हन्टलं

"गुड मोर्निंग.इतक्या सकाळी कसा काय उठलास?"
"कसा म्हणजे ??? मी आत्ताच जिम करून आलो"
"काय??????????" माझी झोप उडालीच.
"अरी सुरपरिसे के होतोस एवढा.मी लावानाराच होतो जिम"
"ओह गुड.कसं आहे जिम?"
"सही आहे एकदम.सगळे intruments छान आहेत, instructor is very good"
"चला म्हणजे सुरुवात तर चांगलीच झाली.keep it up"

बन्या ने भलतच जिम मनावर घेतलं.पुढचे चारही दिवस तो न चुकता जिम ला गेला. त्यानंतर दोन दिवस सुट्टी.आता गोष्ट अशी झाली की बन्या ने गुरुवारी अणि शुक्रवारी सुट्टी घेतली.आठवड्याची सुट्टी शनिवारी चालू होते म्हणुन जरा जास्त वेळ झोप मिळाली पाहिजे.झाली की नाही गम्मत.बन्या ने थोडासा schedule change केले.शनिवारी आणि रविवारी जिम ला सुट्टी घेतली आणि सोमवारी सकाळी जिम ला गेला.४ दिवसाची gap झाल्यामुळे त्याचं थोडासं अंग दुखत होतं आणि थोड़ा उत्साह पण कमी झाला होता. मंगळवारी अंग दुखते म्हणुन, बुधवारी कंटाळा आला म्हणुन, गुरुवारी जाग आली नाही म्हणुन, तर शुक्रवारी उद्या जाऊ म्हणुन बन्या जिम ला गेला नाही.

हे सगळं असं होणार अशी दाट शक्यता मला होती.अखेर जिम वाल्या माणसाला convince करून बन्या ५००० Rs परत घेउन आला आणि ते जिम बंद केले.

"what next?" मी विषय काढला
"यार जिम फार हेक्टिक आहे रे. मला काय वाटतं योगा आणि dieting सुरु करावं.तुला काय वाटतं?"
"wow बेस्ट आईडिया आहे.फक्त ३ महिन्याचे एकदम पैसे भरू नकोस"
"तू माझी टिंगल करतोयस ना. बाघ मी बारीक़ होउनच दाखवतो आता"

बन्या ने १ महिन्यचेच योगा क्लास्सेस चे पैसे भरले.त्यावारुनाच त्याचा निश्चय किती आहे हे मला दिसले होते. पण एक मित्र ह्या नात्याने मी त्याला support करणं माझं कर्तव्य होता

"कसा आहे योगा teacher?"
"अरे एकदम सही आहे.योगा चे किती तरी फायदे असतात यार.not only for weight control but for fitness it is very important"
"गुड मग कधी पासून जाणार आहेस?"
"उदय पासूनच.रोज सकाळी १ तस् ७ ते ८ योगा आणि मग ऑफिस"
"गुड"

दुसरया दिवशी बन्या ऑफिस मध्ये जरा थकल्यासारखा वाटला
"कसा होता योगा चा पहिला दिवस?"
"गेल्या गेल्या instructor ने मानेचे आणि हातचे warm up exercise घेतले.मग त्याने पाठीतून खाली वाकून उभं रहायला संगीतालं आणि किती तरी वेळ तसच उभं केलं"
"मग?"
"तो वरच करेना आम्हाला"
"मग?"
"माझ्या हाता पायात खुप गोळे यायला लागले"
"मग?"
"मग काय.त्याचे counts इकडे चालूच.मला वाटलं १० आकडे म्हंटल्यावर थांबेल.१० चे १५ झाले ,२० झाले तेव्हा कुठे त्याच्या मनासारखे झाले.त्याने सरळ उभे केले आणि मला चक्करच आली"
"काय????????????"
"हो मी मटकन खालीच बसलो"
"मग?"
"मग त्याने मला शवासन करायला सांगितले. तो बोलला की फर्स्ट डे आणि तुझ्या शरीराला अजिबात फ्लेक्सिबिलिटी नाहीये म्हणुन असं झालं."
"मग?"
"मी शावासनत गेलो असा मला वाटलं पण मी झोपुनाच गेलो.15 मिनिटाने त्याने जवळ येउन उठवले आणि मला उदय यायला सांगितले"
"हा हा हा हा.i dont belive हे सगळं असं झालं असेल"
"ते योगा फार torture आहे रे.मला काही जमणार नाही"
"yea,जाऊदे आपण दूसरं काहीतरी पाहुया. तो सरल सोप्पा morning walk ला का नाही जात?"
"thats a good idea.पण आता next monday पासून. हा आठवडा जाऊदे"

next monday ला बन्या ने खरच त्याचा शब्द पाळला. तो सकाळी morning walk ला गेला. त्याच्या घर जवळच एक टेकडी होती. ती चढून गेला आणि successfully उतरुनहि आला. बन्याला चांगलाच हुरूप आला होता.दुसरया दिवशी "जोश मी आके" त्याने पळत पळत टेकडी चढली आणि पळतच उतरली.पण बन्या ने काही करुच नए अशी देवाशी इच्छा असावी बहुदा.
बन्या ने रडवेला होउन मला फ़ोन केला

"मक्या , यार आज मला घरी pick up करायला ये ना.मग गाडीवर ऑफिस ला जाउया"
"काय रे काय झालं?"
"काही नाही रे.सकाळी टेकडी पळुन आलो आणि पायात उसण भरली आहे.चालताच येत नाहीये.रात्रि विश्रांति घेतल्यावर ठीक होइल असं वाटत आहे."
"ओके मी येतो तुझ्या घरी"

मी बन्याला जसा ऑफिस ला घेउन गेलो तसाच डॉक्टर कडेही घेउन गेलो.बन्याची उसण भारीच निघाली.डॉक्टर ने बन्याला भरपूर pain killers दिल्या,पायाला लावायला मलम दिला, आणि गुडग्या पासून तळपायापर्यंत बांधायला पट्ट्या दिल्या.शिवाय 1 month रेस्ट compulsary.फक्त ऑफिस ला जाणे आणि येणे एवढेच allowed केले.exercise बंद.

१ महिना झाला.बन्या पूर्ववत् झाला.आता त्याने वजन कमी करण्याचा नादच सोडला होता.

असाच एक दिवस योगा योगाने माझी बस आणि बन्या ची pulsor एकाच वेळेस ऑफिस ला पोहोचली.
त्याला pulsor वर बघून मला हसुच अवरेना.ती pulsor अचानक छोटीशी दिसायला लागली होती आणि एवढ्या छोटुश्या pulsor वर एवढा मोठा मुलगा बसलेला कल्पना करा किती मजेदार दिसत असेल.

रविवार, १ फेब्रुवारी, २००९

3.बन्या प्रोजेक्ट मध्ये रमतो

बन्याला प्रोजेक्ट allocate झाला आणि बन्या भलताच busy झाला. मागचा पूर्ण आठवडा बन्या मला भेटलाच नाही. मी तर join झाल्यापासून प्रोजेक्ट मध्ये काम करतो पण कधी इतका busy नाही झालो की मित्राशी ५ मिनिट पण गप्पा मारू शकलो नाही. पण बन्या भलताच कामसू निघाला. ह्याची भेट घ्यायला ह्याच्या डेस्क वरच जावं लागेल।
आज सकळीच माझा मोर्चा बन्या च्या डेस्क कड़े वळाला. तसा मला थोड़ा doubt आलाच होता . तो आता वसुधा च्या टीम मधे होता ना. मी वसुधाला नीट ओळखतो. माझ्याच बस स्टॉप ला चढाते ती. कधी कधी बोलते सुध्धा.

मी बन्याच्या जागेवर पोहोचलो अणि माझी शंका खरी निघाली. हा मुलगा डेस्क वर नाहीच. मी लगेच वसुधा चा डेस्क शोधला. तर ही मुलगी फुकटच्या फ़ोन वर कोणाशी तरी गप्पा मारत होती.
हा पोरगा गेला कुठे????तेवढ्यात बन्या अतिशय वेगाने आला आणि मला जवळपास ढकलूनच वसुधा कड़े गेला. हातातले पुस्तक ठेवले. ती गोड हसली. हा एकदम लाजला अणि माझ्याकडे आला.माझा डोकं तसा फिरलच होतं. मी चिडूनच म्हणालो
"एवढा दोस्तं परका झाला का की पार ढकलून तिला पुस्तक द्यायला गेला ते"
"अरे यार तुला नाही कळायचं ते.ती microsoft चे सर्टीफिकेशन करत आहे मग मला मदत नको का करायला।"
"तू काय मदत करणार? तू तर back end मध्ये काम करतोस ना?"
"हो पण सचिन आहे ना , तो आहे front end मध्ये.ती कल बोलली की तिला सर्टिफिकेशन चे पुस्तक हवे आहे.मग आम्ही दोघानी खूप शोधले।"
"आम्ही दोघानी म्हणजे?"
"मी आणि सचिन ने"
"Dont tell me तू त्याला पण कामाला लावलस?"
"मग त्यात काय बिघडलं?"
"सापडले एकदाचे पुस्तक"
"कोणाकडे?"
"सचिन च्या प्रोजेक्ट मध्ये एक मुलगा आहे त्याच्या रूम मेट कड़े"
"काय?????"
"मी लगेच तिला आणून दिले।"
"काय????"
"सारखं काय काय काय करतोस?" ती पास झाली तर मला आनंदच वाटणार आहे ना"
"पण सचिन च्या मित्राच्या रूम मेट कडून आणून द्यायची काय गरज होती? त्यापेक्षा तिला पुस्तक विकतच आणून द्यायचे होते , बरोबर receipt पण आणून द्यायचिस"
"किती कुचकट बोलतोस रे. ती लवकरच पुस्तक परत देइन यार।"
“बर ते जाऊदे. कुठे होतास आठवडाभर? एकदा पण चहा प्यायला नाही आलास की लंच ला नाही दिसलास .हिच्याच मागे होतास वाटतं”
“अरे तसं नाही. जरा प्रोजेक्ट मध्ये काम होतं. ती सर्टिफिकेशन ची तयारी करत आहे म्हणुन मीच आपली तिला मदत करत होतो कामत।”
“ म्हणजे? आता तू front end च कोड पण लिहितोस की काय?”
“हो, सोपा असतो, copy paste जिंदाबाद”
“आणि back end coding?”
"ते पण मीच करतो. तिचे काम दुपार पर्यंत संपते. ती ६ ला गेली की मग माझे सुरु करतो.मस्त ऑफिस चे फुकट डिनर खातो आणि १२ ला शार्प घरी”
“वाह! तू म्हणजे कमाल आहेस”
“मग आहेच मी मुळी तसा”

बन्या स्वतः वर भलताच खुश झाला होता एकंदर काय तर ती मुलगी सर्टिफिकेशन करत होती आणि ह्याला तिने कामाला लावले होते. त्यानंतर मीच वसुधा शी बोलेनासा झालो. ती मला बऱ्याच वेळेस cafeteria मध्ये टाइमपास करताना दिसायची आणि बन्या काम करताना डोळ्यासमोर दिसायचा.एक दिवस बन्याचा फ़ोन आला


“मक्या अरे तुझ्या कड़े disprins , asprin ,saridon किंवा crocin आहे का रे?”
“काय रे? काय झालं?”“अरे ४ दिवासंपासून झोपच मिळत नाहीये, रिलीज़ जवळ आले आणि खूप डोकं दुखत आहे. ताप पण भरला आहे अस वाटतय”


मी तसाच बन्याकडे गेलो.त्याचा चेहरा फारच उतरला होता. दोन्ही कोड त्यालाच लिहायचे म्हंटल्यावर असे होणारच. वसुधा च्या नादामध्ये तो सलग ४ दिवस १६ १६ तास काम करत होता. अखेर त्याचे रिलीज़ झाले.वसुधने खुपच प्रेमळ thank you म्हंटले.बन्या तेवढ्यानेही खुश झाला.म्हणतो कसा
“बघितलस मला किती छान thank you म्हंटले तिने”
“हो!!!!! म्हाणनारच.काम चुकार कुठली. सगळं काम तुझ्या कडून करून घेतलं नि स्वतः मात्र सर्टिफिकेशन केलं.उद्या १००% hike घेउन दूसरी कड़े जाईल सुध्धा”
मी असे बोलुन गेलो खरा पण माझे मलाच माहित नव्हते की मी बोललेले वाक्य़ तंतोतंत खरे होइल. वसुधा चे दुसरयाच दिवशी गुड बाय चे मेल आले. मी लगेच बन्याला फ़ोन लावला
“अरे वसुधा चे मेल पाहिलेस का?”
“हो पाहिले ना” पलीकडून बन्याचा रडका आवाज आला
“कुठल्या कंपनी मध्ये चालली आहे ? any idea?”
“sap labs”
बन्याचे उत्तर ऐकून मी उडालोच. पुन्हा sap labs!!!!!!!!!!
“किती hike?”
“१००%”मी गारच पडलो. तरी पण मी बन्याला विचारले
“तुला सांगितलं होतं का तिने?”
“नाही रे , काहीच बोलली नाही. सकाळी म्हणाली सगळ्या formalities पूर्ण करून गप्पा मारु. मी वाट पाहत बसलो तर कधी गुड बाय चे मेल टाकुन निघून गेली कळालेच नाही”
“काय????? म्हणजे ती तुला भेटून सुद्धा गेली नाही?”
“नाही”
“आणि पुस्तक?”
"ते पण परत नाही केलं. म्हणाली नंतर मैत्रिणी बरोबर पाठवुन देते”

अशा प्रकारे वसुधा ने तिचा खरा रंग दाखवला होता. शेवटी बरेच दिवस वाट पाहून बन्याला ते पुस्तक स्वतःच खरेदी करून सचिन च्या मित्राच्या रूम मेट ला द्यावे लागले।

ह्या प्रसंगाने बन्या बराच शहाणा झाला होता. आता तो मन लावून त्याचे काम पण करत होता आणि स्वतःचे सर्टिफिकेशन पण करत होता.तो बराच नोर्मल पण झाला होता. एक दिवस मला बोलवायला आला
“चहा ला येतोस?”
“चल”
मी लगेच त्याच्या बरोबर गेलो. बन्या फारच खुशीत दिसत होता. कुठे तरी बाहेर जाऊन आला होता. मी त्याला विचारलं
“कुठे बाहेर गेला होतास?”

त्याचे पुढचे उत्तर ऐकून मला चहाचा कप फोडूनच टाकावासा वाटला, अस वाटलं खूप हसत सुटावे, त्याला धरून खूप मारावे, स्वतःचे डोके दगडावर आपटून घ्यावे अश्या मिश्र फीलिंग्स माझ्या मनात आल्या. बन्या एवढा सगळ होऊन सुध्धा इंटरव्यू ला गेला होता आणि कंपनी होती “sap labs”

शुक्रवार, २३ जानेवारी, २००९

2. Banya ani Trisha


मी हळुहळु बंगलोर च्या वतावरणात रुळु लागलो आणि बन्या च्या मैत्रितहि. बन्या माझ्या आधी महिन्यांनपासून कंपनीत होता त्यामूळे असेन किंवा त्याच्या बडबड्या स्वभावामूळे असे, त्याला ऑफिस ची आणि ऑफिस मधील लोकांची चांगलीच माहिती होती. ऑफिस मधल्या एकूण एक मुलींचा बायोडाटा त्याच्याकडे होता. आणि त्याचा बायोडाटा म्हणजे त्यात तिचे नाव, गो, कॉलेज, पास आउट इयर, डिग्री,बस route, लोकल adress असे बरेच काही होते.
एक दिवस स्वारी सकळीच डेस्क वर अली.
चहा ला येतोस?”
चलमी लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून त्याच्या बरोबर जाऊ लागलो.खर तर मला पण टाइमपास करायचाच होता.तो आल्यामूळे मला आयतीच सोबत मिळाली.आम्ही रुपयाचा चहा घेउन कट्ट्यावर बसलो. हे multinational कंपनी वाले भलतेच हुशार असतात. बेंच पब्लिक साठी असे बरेचसे कटटे बनवलेले असतात म्हणजे त्यानां टाइमपास करायला सोप्पा.


काय रे, आज मूड मध्ये दिसत नाहीस तू, काय झाला? इति मी.
काही नाही यार, टी त्रिशा आहे ना , तिने पेपर टाकला
कोण त्रिशा?”

तुला त्रिशा नाही माहित??????”बन्या ने एवढ़या आश्चर्याने प्रश्न विचारला की मला लाजल्याहून लाजल्या सारखे झाले.नक्कीच ही त्रिशा कोणीतरी फारच सुंदर, famous मुलगी असणार आणि मला इथे येउन महिना झाला तरी कळाले नाही.
मी शक्य तितक्या थंडपणे म्हंटले
नाही रे माहित
अरे यार, तुला त्रिशा कशी माहित नाही. मी दाखवेन तुला दुपारी कैंटीन मध्ये
कुठल्या कंपनीत चालली आहे” any idea?”
इथेच समोर Sap Labs मध्ये. तुला माहित आहे का तिला ८०% hike मिळाली आहे
हो का सहीच रे
उद्या तिचा लास्ट डे आहे इथे
अछा

एक उसासा टाकुन बन्या म्हणाला

च्यायला तिचे खरे नाव पण कळाले नाही
काय???? म्हणजे त्रिशा हे तिचे खरे नाव नाही???”
नाही, अरे मीच तिला त्रिशा म्हणतो. इथे एकदा तेलगु मूवी ला गेलो होतो.त्यातली हेरोइन त्रिशा. ही मुलगी तिच्या सारखी दिसते म्हणुन मी आपला तिला त्रिशा म्हणतोबन्याने खुलासा केला.
तू तिला सांगितलं का की ती त्रिशा सारखी दिसते
मी कसा सांगणार , मी तर कधी तिच्याशी बोललो पण नाही
वाह! म्हणजे सगळं काही हवेतच आहे आणि तू इथे उदास का बसला आहेस
अरे यार.तुला नाही कळायचं
बन्या फारच सेंटी झाला होता.
दुपारी लंच ला जाताना सांग. आज तुझ्या त्रिशा ला पाहूया

लंच च्या वेळेस बन्याचा मिस कॉल आला तसा मी cafeteria गेलो. बन्या माझी वाटच पाहत होता. आम्ही डिश घेतल्या आणि मी टेबल शोधू लागलो.बन्या फारच घाईने एका टेबलावर जाऊन बसला.मी त्याच्या समोर बसलो. तसा तो मला म्हणतो

ती बघ ती तुझ्या राईट साइड ला बसली आहे ना ती त्रिशा
मी लगेच राईट साइड ला पाहिले.फरसा लक्षात यावा असा कोणताच चेहरा मला दिसेना.मी त्याला विचारलं
कोणती रे?”
अरे ती ग्रीन ड्रेस मधली


बन्या पण ना!!!!! कधी कधी इतका बोलतो आणि आता येवढ़ं शाँर्ट डिस्क्रीप्शन देत होता. माझ्या राईट साइड ला ग्रीन ड्रेस मध्ये मला कोणीच दिसेना. हा कलर ब्लाईंड झाला की काय अशी शंका माझ्या मानत आली. मी पुन्हा विचारले

कोणती ग्रीन ड्रेस वाली?”
अरे ती वेणी वाली बघ ना.लवकर बघ तिचे जेवण होत आले आहे


मी पून्हा राईट साइड ला ग्रीन ड्रेस आणि वेणी अशी मुलगी शोधू लागलो.मला तरीही कोणीच दिसेना. मी पुन्हा वैतागुन विचारले


कोणती रे?”
अरे यार लवकर बघ ती पाठमोरी बसली आहे, लवकर पहा ती उठेलच आता


मी पटकन तिकडे पाहिले. मी तिकडे पहायला आणि तिने टेबल वरुन उठायला एकाच वेळ झाली. आमची नजरा नजर झाली. मी ओशाळलो.तिने माझ्याकडे बघून एक जळजळीत कटाक्ष टाकला. “bloody boys” हे फीलिंग. बन्या ने मला चांगलच तोंडघाशी पाडले. So called त्रिशा ची आणि माझी पहिली आणि शेवटची नजरा नजर चांगलीच भेदक ठरली.वर पुन्हा ह्याचे ओरडणे चालूच. जणू मीच तिकडे बघून चुक केली होती. असो.


त्रिशा गेली.बन्या दुसरया दिवशी फारच उदास वाटला. त्याला काहीतरी समजवाला पाहिजे म्हणुन उगीच म्हणालो

चलता है यार. दूसरी कोणीतरी मिळेल
च्यायला ती मिळाली असती ना तर फार बरं झालं असतं.ती साउथ इंडियन म्हणून आम्हाला साउथ च्या चारही स्टेट मध्ये प्रॉब्लम नसता आला आणि नॉर्थ मध्ये मला हिन्दी येते म्हणून तिकडेही जमलं असतं


ज्या मुलीचे खरे नावही माहित नाही , ती खरोखरीच साउथ इंडियन आहे की नाही हे माहित नाही तिच्या बद्दल बन्या ने येवढ़ा पुढचा विचार केला होता.कमाल आहे ह्या मुलाची. आता ह्याला नॉर्मल व्हायला किती दिवस लागतात देव जाणे. पण बन्या फारच लवकर म्हणजे संध्याकाळीच नॉर्मल झाला. संध्याकाळी मला चहा ला बोलावले


अरे ती त्रिशा ची मैत्रिण आहे ना
कोणती?”
ती नाही का काल तिच्या बरोबर जेवायला बसली होती
तिचा काय?”
मला तिच्या प्रोजेक्ट मध्ये टाकलं आहे
मला जे कळायचं होतं ते कळालं आणि चाणक्ष वाचाकानाही कळालच असेल.बन्याची नविन प्रेम कहानी सुरु झाली होती.